रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव ने “वृक्षदिंडी ” काढत केली जनजागृती.
राहाता / लोकवेध live न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव याठिकाणी आज विद्यालयामध्ये वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले होते . ” विद्या सहयोग सोशल वेल्फिअर अँड एज्युकेशन सोसायटी ” यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते श्री.उमेश शिंदे यांनी वृक्षारोपणासाठी 140 झाडांची रोपे विद्यालयास दिली . शाळेमधून वृक्षदिंडी वाजत गाजत गावामध्ये नेण्यात आली . श्री .उमेश शिंदे यांच्या घरी वृक्षदिंडी चे स्वागत करण्यात आले . त्याठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी गावातील श्री .मल्हारी मते , श्री .माणिक शिंदे ,श्री .संजय शिंदे ,श्री .संतोष हळदे , श्री .पोपट शिंदे उपस्थित होते . सामाजिक संदेश देणारे अनेक फलक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिसत होते .
गावातून वृक्षदिंडी ची मिरवणूक पुन्हा विद्यालयामध्ये परत आली . यानंतर शाळेमध्ये रिंगण सोहळा पार पडला. यानंतर विद्यालयात वृक्षारोपणाचा सभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री .मल्हारी मते हे होते .याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री.उमेश शिंदे यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्व समजून सांगत झाडांची निगा राखण्याबाबत मुलांना आवाहन केले . विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मुरलीधर हिंडे यांनी विद्या सहयोग सोशल वेल्फिअर अँड एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष श्री .उमेश शिंदे यांचे आभार मानले .शाळेला त्यांनी दिलेल्या १४० झाडांचे शाळेच्या वतीने संवर्धन करण्याबाबत आश्वासित केले .श्री.मल्हारी मते यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून शाळेतील उपक्रमाबद्दल कौतुक केले . काही विद्यार्थी भाषण कु . प्रतिक्षा पवार , कु . निकीता मोरे , कु . श्रेया उखार्डे मुलांनी झाडांचे महत्व विशद करत आपले विचार व्यक्त केलेत . या कार्यक्रमाचे नियोजन श्री .अतुल माळेकर व श्री. जनार्दन धूम यांनी केले . वृक्षदिंडी सजावट , वेषभूषा व फलखलेखन श्री . हेमराज नागपूरे , ढोलताशा व लेझीम सादरीकर नियोजन श्रीम.उर्मीला भोये , श्रीम. रेखा गवळी यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी श्री .निवृत्ती भोये ,श्री.उमेश शिंदे ,श्री .संजय शिंदे , श्री.संतोष हळदे , श्री .सुदाम हळदे ,श्री .अशोक माळोदे उपस्थित होते .सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री.फुलमाळी संतोष यांनी केले . सर्व उपस्थितांचे आभार श्री. पाटील जगदीश यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला .
