अटल भूजल योजनेअंतर्गत डिग्रस विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयांमध्ये सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना चित्रकला वकृत्व व रांगोळी या स्पर्धा केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना, संगमनेर यांनी राबविलेल्या.
राज्याच्या १३ जिल्ह्यात ३८ तालुक्यात १४४२ गावांमध्ये या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यवस्थापन कक्ष व जिल्हा भागीदार संस्था वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) संस्थेद्वारे सर्वच घटकापर्यंत योजनेची जाणीव जागृती होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करायचे असेल तर शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असणे तितकेच महत्वाचे आहे कारण शालेय विद्यार्थी हे उद्याचे भावी सुजाण नागरिक आहेत. या जाणीव जागृती उपक्रमामध्ये विद्यार्थी चित्रकला स्पर्धे मध्ये सहभाग घेतला,ज्यामध्ये अटल भुजल योजना काळाची गरज , भूजल नसेल तर, जलसुरक्षेचे महत्त्व, शाश्वत भूजल शाश्वत शेती या विषयांवर विद्यार्थी चित्र काढले. त्याचबरोबर वकृत्व स्पर्धेमध्ये अटल भुजल योजना काळाची गरज , भूजल नसेल तर, जलसुरक्षेचे महत्त्व, शाश्वत भूजल शाश्वत शेती या विषयांवर वकृत्व स्पर्धेतव रांगोळी स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सर्व्हेक्षण व विकास यंत
वरिष्ठ भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अहमदनगर रश्मी कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भागीदार संस्था वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) संस्थेच्या वतीने तालुका समन्वयक श्री गणेश शिंदे , अहमदनगरचे समन्वयक गणेश पवार,समुदाय संघटक श्री राजेंद्र शिंदे व श्री.प्रितम पावसे यांच्या माध्यमातून स्पर्धा घेतल्या गेल्या.
यामध्ये सोमेश्वर सर्व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत बुवाजी बाबा पुणेकर , उपाध्यक्ष महंत उमाजी बाबा पुणेकर, सचिव जानकीराम बुवाजी पुणेकर, मुख्याध्यापक पांडुरंग बाचकर सर्व शिक्षक व शालेय विद्यार्थी यांच्या सक्रीय सहभागामुळे खऱ्या अर्थाने शाश्वत जल व्यवस्थापनाचे बीज रोवले जात आहे.
