पेटिट विद्यालयात विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली दिवस

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

शहरातील सर डी एम पेटिट विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १८ ऑगस्ट शून्य सावली दिवस प्रत्यक्षात अनुभवला. विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ अस्मिता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मैदानात गोल रिंगण करून दुपारी बरोबर १२ वाजता शून्य सावली दिवस अनुभवायास मिळाला. इतर दिवशी आपली सावली आपल्यापासून दूर असते परंतु या दिवशीआपली सावली बरोबर आपल्या पायाजवळ असल्याचे विद्यार्थ्यांनी अनुभवले. या प्रसंगी ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री शिवलिंग भोर , अमोघ कुलकर्णी, जगदीश सावंत, प्रा. भाऊसाहेब मांढरे, प्रा. अमोल टेमक प्रा. दशरथ गभाले प्रा. सिमिका मिश्रा आदीसह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विज्ञान शिक्षक भोर सर विद्यार्थ्यांना माहिती देताना म्हणाले की, सर्वात मोठा दिवस २१ जून हा असतो.२२ जून पासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होऊन दिवस लहान होत जातो. २२ डिसेंबर सर्वात लहान दिवस असतो.२३ डिसेंबर पासून सूर्याचे पुन्हा उत्तरायण सुरू होऊन दिवस मोठा- मोठा होत जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!