अमृतवाहिनीच्या मेधा तारांगणात राज्यभरातील विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सहभाग

मराठी चित्रपट तारे तारकांची मोठी उपस्थिती

संगमनेर (प्रतिनिधी) लोकवेध live न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ शरयूताई देशमुख व राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या मेधा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री पार्श्वगायक, गीतकार ,संगीतकार यांसह राज्यभरातील विद्यार्थ्यांची राहिलेली उपस्थिती हे या मेधाचे वैशिष्ट्य ठरले असून मेधा कपमध्ये अमृतवाहिनी बी फार्मसी प्रथम, अकोले कॉलेज द्वितीय तर इस्लामपूर येथील सांगली कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला आहे .

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने मेधा मैदानावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश ,व्यवस्थापक प्रा. व्ही बी धुमाळ, मेधाचे समन्वयक प्रा. जी.बी. काळे, प्रा विलास शिंदे यांच्यासह मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाड, अभिनेता पृथ्वीराज, कालिंदी, पार्श्वगायत हर्षवर्धन वावरे ,नितीन उगलमुगले, ओंकार स्वरूप बागडे आदी उपस्थित होते..

अमृतवाहिनीतील मेधा महोत्सवात गायन, वादन, ड्रामा, मिमिक्री, नृत्य ,सामूहिक नृत्य, रांगोळी पथनाट्य यांसह 28 इव्हेंट मधून 1140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मेधा कप मध्ये इस्लामपूर, सांगली, औरंगाबाद ,धुळे ,नाशिक, ठाणे, कल्याण, अकोले या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षनिय ठरली. तर यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक हर्षवर्धन वावरे व नितीन उगलमुगले यांनी आपले गीते सादर केली. याचबरोबर टाइमपास थ्री या चित्रपटाची नायीका  कृतिका गायकवाड हिने चंद्रा या गीतावर लावणी सादर केली .या समवेत आगामी येणाऱ्या टिडीएम चित्रपटाचा नायक पृथ्वीराज व कालिंदी यासह बबन व ख्वाडा सिनेमाचा गायक ओंकार स्वरूप बागडे यांनीही विविध गीते सादर केली. या कलाकारांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.

मेधा कप मध्ये महाविद्यालयीन गटात अमृतवाहिनी बी फार्मसी ने प्रथम क्रमांक, अगस्ती कॉलेज अकोले द्वितीय क्रमांक व इस्लामपूर सांगली महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला तर माध्यमिक विद्यालय गटात अभिनव पब्लिक स्कूल अकोले प्रथम क्रमांक, पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा द्वितीय क्रमांक व अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

या विद्यार्थ्यांना 21000 रुपये 15000 रुपये व 11 हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली आदिवासी नृत्य, कोळीगीत, शंकराचे तांडव, भांगडा सॉंग, मराठमोळ्या लावण्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, भारतीय सैन्याची जीवनगाथा हे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले..

यावेळी डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ मनोज शिरभाते प्रा एस.टी. देशमुख, सौ जे बी सेट्टी, अंजली कन्नवार, नामदेव गायकवाड, प्रा अशोक वाळे ,प्रा विजय वाघे आदींसह चैतन्य जोशी आशिष वर्पे रुक्मिणी देशमुख यांचा विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रा जी.बी काळे यांनी आभार मानले .

चौकट
मेधा 2023 फायरवर्क्सची आतिषबाजी

मेधा मैदानावर असलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई सह नायगारा धबधबा दर्शवणारी फायर वर्क्स ,त्याचबरोबर फुल झडयाचा वर्षाव ,आकाशातील आतिश बाजी हे या मेधाचे  खास आकर्षण ठरले असून सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या या फायर वरच्या आतिषबाजीमुळे मेधा 2023 हा संस्मरणीय झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!