साहेब सरकार कृषि अभियंत्यांच्या मरणाची वाट बघत आहे का? आतातरी सांगा न्याय मिळेल का – कृषि अभियंत्यांची आर्त हाक 
 कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा ३५ वा साखळी उपोषणाचा दिवस
राहुरी कृषी विद्यापीठ प्रतिनिधी /  लोकवेध live न्यूज 
 अभियंते आज स्वतः च्या रक्ताने आपल्याला पत्र देऊन विनंती करत आहे की, साहेब आता तरी थोडं लक्ष कृषि अभियंत्यांकडे द्या,‌ आमचे म्हणणे तरी ऐकून घ्या साहेब, आमच्या सोबत चर्चा तरी करा. 
साहेब सरकार कृषि अभियंत्यांच्या मरणाची वाट बघत आहे का? आतातरी सांगा साहेब??? कधी  न्याय देणार? मेल्या नंतर का साहेब? साहेब कृषि अभियंत्यांना न्याय द्या की जीव घेता का साहेब आता सांगा ना साहेब?? आई बापाला काय सांगू साहेब? की तुमच्या मुलंच भविष्य अंधारात घातलं?? आत काय करू सांगा साहेब?? न्याय देणार का साहेब??
     महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे यासाठी गेली ३५ दिवसांपासून धरणे/साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत आजही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. विद्यार्थ्यांची विनंती आहे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करावी व कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी पदवी असतानाही मृदा व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यां पात्र का नाही? कृषि अभियंत्यांना संधी का दिली जात नाही? कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी ही मागणी सरकारकडे कृषि अभियंते करत आहेत तरी सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही. सरकारने लवकरात लवकर कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!