समाज विकासासाठी वाचनालय आवश्यक- भानुदास आभाळे..
योगदान वाचनालयात ग्रंथदिन उत्साहात साजरा..
संगमनेर / लोक वेध live न्यूज 
पुस्तकामुळे मस्तक घडतं, मस्तकामुळे समाज घडतो.. समाज विकासासाठी वाचनालय काळाची गरज आहे. असे विचार अक्षरभारती संस्था पुणेचे ज्येष्ठ मार्गदर्शक भानुदास आभाळे यांनी व्यक्त केले.
योगदान सार्वजनिक वाचनालय तळेगाव दिघे या ठिकाणी नुकताच ग्रंथदिन साजरा झाला.याप्रसंगी  विचार पिठावर अक्षरभारतीचे राज्य समन्वयक गणेश वाघस्कर, आयाज सय्यद, संत गाडगेबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.चं का.देशमुख,   उपस्थित होते.
      अक्षरभारती ही संस्था देशभरात वाचन चळवळ विकसित होण्यासाठी हजारो वाचनालयांना दर्जेदार पुस्तके देत मोलाचे योगदान देत आहे.
     संत गाडगेबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा चं का देशमुख यांनी योगदान वाचनालयास *फिरते वाचनालय* या उपक्रमासाठी पाच दर्जेदार स्टीलच्या पेट्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेट दिल्या.
       यावेळी पोलीस पाटील दत्तू इल्हे, सामाजिक कार्यकर्ते नजीर भाई शेख, गणेश जोर्वेकर, यांचेसह राजू सय्यद, संदीप गोडगे, सचिन शिंदे, जाफर शेख, वैभव दिघे, ग्रंथपाल नामदेव पिंगळे, शाम दिघे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!