दुखावटा व जुन्या चालीरीतींना फाटा देत विद्यार्थ्यांना डायरी पेन वाटप केले

पिंपरणे / लोकवेध live न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील
स्व कौशाबई तुकाराम गायकवाड यांच्या जलदान विधी कार्यक्रमानिमित्त इतर धार्मिक विधी जुन्या परंपरा यांना फाटा देत कोणत्याही प्रकारचा दुखवटा घेणे देणे पद्धत बंद करत विद्यार्थ्यांना डायरी पेन भेट देण्यात आले यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादू यादव
साहेबराव यादव, दिलीप यादव, बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब यादव सर, अर्जुन बागुल लक्ष्मण गायकवाड
यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबविला
यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक रवी रोहम, प्राचार्य मुकुंद डांगे, प्राध्यापक डोंगरे दिलीप, दादू यादव,साहेबराव यादव, दिलीप यादव, बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब यादव सर, संजय बागुल, अर्जुन बागुल नाना वाकचौरे त्यांच्या हस्ते परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायातील अकरावी सायन्स विद्यार्थाना दैनदिनी कामासाठी डायरी व पेन देवून विद्यार्थाना मार्गदर्शन केले
यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की ज्यावेळेस बदल करायचा असतो त्यावेळेस बदलाची सुरुवात ही स्वतःपासून करावी म्हणून आम्ही कौशाबाई गायकवाड यांच्या जलदणविधी निमित्त आहेर प्रथा मोडीत काढून त्याऐवजी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यासाठी जे देशाचे उद्याचे भविष्य आहे त्यांच्यासाठी काही करायचे म्हणून विद्यार्थ्यांना डायरी व पेन देऊन हा उपक्रम राबविला.
परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख सचिव कैलास काळे, प्रा चार्य मुकुंद डांगे व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका या सर्वांनी या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!