प्राचार्य जनार्दन बर्डे यांना अहमदनगर जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
रयत शिक्षण संस्थेच्या,अश्वि इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अश्वी बुद्रुक ता. संगमनेरचे प्राचार्य जनार्दन रंगनाथ बर्डे सर यांना अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अहमदनगर यांच्या वतीने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे नवनवीन मार्ग खुले करून देत त्यांना नवीन युगाची ओळख,क्षमतांचा विकास, तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधल्याबद्दल अहमदनगर जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर,आमदार दराडे साहेब, शिक्षण संचालक मा.सूर्यवंशी साहेब, शिक्षण उपसंचालक मा.आहेर साहेब, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा.पंडित सर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मा.इले सर, संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा.लहारे सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्राचार्य जनार्दन बर्डे सर यांचे सर्वच स्तरातूनअभिनंदन होत आहे.
