संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावातील शाहूनगर (आनंदवाडी) येथील अत्यंत गरीब परिस्थितीत जन्म घेऊनही आपल्यातील पारंगत असलेल्या सुप्त गुणांना वाव देत पाककलेमध्ये सर्वश्रेष्ठ झालेले… शांत,संयमी, प्रेमळ, मितभाषी आणि लोकप्रिय व्यक्तीमत्व_ शाहुनगर(आनंदवाडी)चे भुषण समता मित्र मंडळ या रजिस्ट्रार सामाजिक मातृसंस्थेचे विद्यमान कोशाध्यक्ष तथा खजिनदार- भाऊसाहेब संपत भालेराव उर्फ काका ( आचारी ) यांना नुकताच कोथमिरे त्रिशुल मसाले यांच्या “पाककला केटरर्स कृतज्ञता सोहळा” आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट आचारी पुरस्कार देण्यात आला त्यांचा त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहुनगर परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार सन्मान सोहळा साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी चंदनापुरी चे सरपंच भाऊराव रहाणे, ग्रामसेवक काळेसाहेब,अभिनेता गोकुळ राहणे, किशोर राहणे, प्रगतशील शेतकरी देवराव रहाणे यासह ग्रामस्थ उपस्थित होते