प्राचार्य मुकुंद डांगे हे आचरणातून शिक्षण देणारे आचार्य आहेत. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ म्हणजे  केलेल्या प्रामाणिक सेवेचा गौरव आहे.- डॉ.संजय मालपाणी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
शिक्षक आजीवन शिक्षक असतो तो कधीही माजी
होत नाही, फक्त शासकीय नियमाने तो सेवानिवृत्त होत असतो, केवळ शाब्दिक उपदेशातून नव्हे तर शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थी घडत असतात. प्रा मुकुंद डांगे यांनी स्वतःच्या आदर्श आचरणातून  शिक्षण विद्यार्थ्यांना दिले.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योजक शिक्षणतज्ञ डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, उपक्रमशील, निसर्गप्रेमी, उत्तम संघटक, मुकुंद डांगे यांचा सेवापूर्ती समारंभ गगनगिरी विद्यालयात पार पडला. त्यांनी एकूण 38 वर्षे सेवा केली त्यात प्राचार्य म्हणून 27वर्षे एवढा प्रदीर्घ काळ सेवा बजावली.
        पुढे बोलताना मालपाणी म्हणाले की, डांगे सरांनी शिक्षकी पेशा हा नोकरी म्हणून न करता ते एक व्रत आहे, या भावनेने स्वीकारला. प.पू.गगनगिरी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी तालुक्यापासून राष्ट्रीय स्तरावरील आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभागी होतात. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवितात, यामागे प्रा डांगे सर व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या तयारीचे सुयश आहे.  प्रा. डांगे यांच्या विद्यार्थ्यांप्रती समर्पित कार्याचा हा गौरव आहे. असे विचार सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभात  डॉ.संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ, अशोकराव कोकणे, रजिस्टार बी आर गवांदे सर, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर , प्रा सुरेश परदेशी, शशांक गंधे व अन्य सदस्य तसेच दत्तात्रय आरोटे सर, शांताराम डोंगरे सर, कैलास कानवडे,तुषार मुंगळे, सुरेश म्हाळस, कारभारी राहिंज, दादासाहेब देशमुख, कैलास काळे, कोंडीराम बागुल सर, विलास साळवे सर, सुभाष पवार सर, भाऊसाहेब वाकचौरे सर, सुरेश ठोंबरे, ग्रा. प. सदस्य निलेश बागुल, बाळासाहेब निकम, उत्तम राहींज, शुभम देशमुख , मंजाबापू साळवे, एडव्होकेट राहुल देशमुख, एस एम खेमनर, के एस खेमनर या सर्व  मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव समारंभ संपन्न झाला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात बापूसाहेब देशमुख यांनी प्रा. मुकुंद डांगे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
एक निसर्गप्रेमी उपक्रमशील शिक्षक, उत्तम व्याख्याते , कुटुंबवत्सल नागरिक, दिलदार मित्र अनेक समाजसेवी संस्थांचे सक्रिय सदस्य अशा अनेक भूमिका प्रा. मुकुंद डांगे यांनी आपल्या आजपर्यंतच्या सेवा काळामध्ये उत्तमरित्या बजावलेल्या  आहेत. याचा उपयोग विद्यालयाच्या प्रगतीसाठी नेहमीच झाला.
  डांगे सरांची संस्थेने प्राचार्यपदी केलेली निवड ही आपल्या कार्यातून  त्यांनी सार्थ ठरवली, असे गौरवउद्गार त्यांनी काढले.
     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्री डी आर सोनवणे यांनी डांगे सरांचा जीवनपट  सांगितला. सर्व शिक्षकांच्या वतीने ललित शेळके यांनी सरांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. विद्यार्थ्यांच्या वतीने अकरावीची विद्यार्थिनी काजल बागुल हीने सरां विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदिका स्मिता गुणे मॅडम यांनी केले.  आभार प्रदर्शन तथागत रोकडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर
कर्मचारी यांनी उत्तम नियोजन केले होते. या कार्यक्रमास विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!