ज्येष्ठ नागरिक दिनानिमत्ताने ज्येष्ठ नागरिक सहल
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त रोटरी हेल्थ सोसायटी ची सहल आयोजित केली होती. निसर्गरम्य परिसर गंगापूर येथील मुक्त विद्यापीठ परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक केंद्रात एक दिवसाची सहल पार पडली.सर्व ज्येष्ठ नागरिक केंद्रात सहभागी झाले होते.
नाच,गाणी,फुगडी व बुद्धिबळ,कॅरम खेळ घेण्यात आले.
सर्वांनी आपले कला गुण साजर केले.मनमुराद आनंद लुटला.
सहलीसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी चहा,नाश्ता घेतल्यानंतर करमणुकीचे कार्यक्रम झाले.दुपारी १:३० वा.जेवण घेऊन परत नाच,गाणे, भजन कार्यक्रम झाले.
ज्येष्ठ नागरिक दिन खूप मजेत साजरा केला,शेवटी सर्वाना संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील व सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सायंकाळी सर्वांनी घरी पोहचवण्यात आले.
अश्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे गणेश ताम्हणे,कोठारी साहेब,स्नेहा पुली यांनी खूप मेहनत घेतली.
