पेटिट जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

सध्या सर्वत्र विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. मोबाईल च्या या काल्पनिक विश्वातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे आणि अभ्यासाबरोबरच पर्यावरणाचा व निसर्गाचा अभ्यास व्हावा म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे, सर डी. एम. पेटिट जुनियर कॉलेजचे प्राचार्य निकम सी.एन.यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ची सहल भीमाशंकर, शिवनेरी, लेण्याद्री, डिंभे धरण मुंबई पॉईंट दर्शन व ओझर या पर्यटन स्थळी नेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना निसर्गाची व आपल्या शिवकालीन गडकिल्ले यांची ओळख व्हावी हा या सहलीमागील उद्देश होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवनेरी येथील शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान तसेच कडेलोट पॉईंट, विविध इतिहासकालीन स्मारके यांचे निरीक्षण व अभ्यास केला. सहल विभाग प्रमुख प्रा दशरथ गभाले यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवनेरी तसेच इतर आजूबाजूच्या गड किल्ल्यांची सविस्तर माहिती शिवनेरी गडावर दिली. या सहली दरम्यान सर्व विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात रमून गेले होते. याप्रसंगी सहलीबरोबर इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड, प्रा. दशरथ गभाले, प्रा. भाऊसाहेब मांढरे, प्रा. सुनीता शिंदे, प्रा. सुशीला चिमणकर आदी मार्गदर्शक शिक्षकांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी सहलीचा प्रवास अतिशय सुखकर झाला बस चालक उत्तम भानुदास राहिंज यांचेही आभार व्यक्त करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!