लातूर दुध प्रकल्पाला रणजितसिंह देशमुखसाहेबांची भेट : मा. आ. धीरजभैय्या देशमुखसाहेबांकडून सत्कार
लातूर –
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी उभारलेला लातूर दुध प्रकल्प पाहणीसाठी संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुखसाहेब यांनी अलीकडेच भेट दिली. या औपचारिक भेटीदरम्यान लातूरचे लोकनेते तथा आमदार मा. धीरजभैय्या देशमुखसाहेब यांनी रणजितसिंह देशमुखसाहेब यांचा विशेष सन्मान करून आदरपूर्वक स्वागत केले.
या प्रसंगी संघाच्या कार्याचा आढावा, दुध संकलनातील गुणवत्ता, प्रक्रिया क्षमता तसेच संघ आणि लातूर दुध प्रकल्प यांच्यातील भविष्यातील समन्वय यांबाबत अर्थपूर्ण चर्चा झाली. ग्रामीण दुध व्यवसायाच्या विकासासाठी परस्पर सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
या भेटीत चेअरमन रणजितसिंह देशमुखसाहेब यांच्यासमवेत संघाचे व्हा. चेअरमन मा. राजेंद्र चकोरसाहेब, संचालक विलासराव कवडेसो, संचालक मा. संतोष मांडेकरसो, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारीसो तसेच डॉ. प्रताप उबाळेसाहेब उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी करून अत्याधुनिक यंत्रसामग्री व उत्पादन व्यवस्थेची प्रशंसा केली.
सहकार क्षेत्रातील विकासासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
