भक्तीमय वातावरणात चिमुकल्यांनी गायली भजने
लायन्स संगमनेर सफायरची भक्तीगीत गायन स्पर्धा उत्साहात
संगमनेर / लोकवेध live न्यूज
लायन्स क्लब संगमनेर सफायरतर्फे लहान मुलांच्या तीन वयोगटांसाठी भक्तीगीत गायन स्पर्धा रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी मालपाणी क्लब येथे पार पडली. वयोगट ७ ते ९, १० ते १२ व १३ ते १५ अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा भरविण्यात आली होती. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास रू. १०००, द्वितीय क्रमांकास रू. ७००, तृतीय क्रमांकास रू. ५०० तर उत्तेजनार्थ रू. ३०० आणि उत्तेजणार्थ अशी एकूण १०,००० रूपयांची रोख पारितोषिके यावेळी स्पर्धकांना देण्यात आली. ही सर्व पारितोषिके मालपाणी ग्रुप तर्फे प्रायोजित केली गेली. संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, मा. अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख प्रियंका मणियार, रितीका भंडारी, पुजा कासट यांनी या भजन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.
अगदी कठीण, शास्त्रीय संगीतावर आधारित काही भजने स्पर्धकांनी सादर केली. एकूण १०० स्पर्धकांनी ऑडिशनसाठी व्हिडिओ पाठविले होते. कुठलेही कटिंग, एडिटिंग, म्युझिक यांचा वापर न करता हे व्हिडिओ सुरूवातीला संयोजकांकडे पाठविण्यात आले. आवाजाचा दर्जा आणि पोत ठरवून परिक्षकांनी ३० स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले. दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २.३० ते ५ या वेळेत या भजन स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. एकूण १०,००० रूपयांची पारितोषिके, ट्राॅफी आणि सर्टिफिकेट यावेळी विजेत्यांना देण्यात आली. ही सर्व बक्षिसे मालपाणी उद्योग समुहाने प्रायोजित केली होती. स्पर्धेचे परिक्षण कैलास राठी, मीना मणियार व सीमा मालाणी यांनी केले. ७ ते ९ वर्षे वयोगटात जान्हवी अमोल वाणी, १० ते १२ वर्षे वयोगटात चिन्मयी विकास भालेराव, १३ ते १५ वर्षे वयोगटामध्ये स्पर्ष प्रकाश पारखे व खुल्या गटात सात्विक अजित काकडे यांनी प्रथम क्रमांक मिळविले. एकूण १६ स्पर्धकांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रियंका मणियार, रितीका भंडारी, पुजा कासट यांनी केले.
या प्रकल्पासाठी उमेश कासट, मेघा अट्टल, नम्रता अभंग, पुष्पा गोरे, वंदना मणियार, स्मिता मणियार, प्रिती काळे, सिमरन भंडारी व सर्व पदाधिकारऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
