एकदरे गावात स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहीम.
पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज
एकदरे येथे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत “स्वच्छता ही सेवा”या मोहिमे अंतर्गत “एक तारीख एक घंटा महाश्रमदान” अंतर्गत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. एकदरे गावात स्वच्छता मोहीम अंतर्गत सार्वजनिक ठिकाणे,रस्ता व परिसरातील जागृत देवस्थान मोखाजी बाबा मंदिर आणि सार्वजनिक परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या स्वच्छता मोहिमे अंतर्गत एकदरे गावात या गावातील रहिवासी असलेले गोरख भांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक कुटुंबाचे अशीच कायमस्वरूपी स्वच्छता ठेवणे बाबत दक्षता घ्यावी व यामध्ये सातत्य ठेवावे. ग्रामसेवक दत्तात्रेय घुमरे यांनी “स्वच्छता ही सेवा” या मोहिमेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार “एक तारीख एक घंटा महाश्रमदान” या उपक्रमाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. स्वच्छतेबाबत असेच सातत्य कायम ठेवणे बाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात आली. तसेच सरपंच विकास भांगरे यांनी स्वच्छतेबाबत महत्त्व विशद करून स्वच्छता मोहिमेत सहभागी ग्रामस्थांचे आभार मानले. याप्रसंगी देवस्थान परिसरात साफसफाई चालू असताना ऐनवेळी उपस्थित झालेले जायनावाडी बिताका गावाचे सरपंच बाळू डगळे यांनी दररोज दहा मिनिटे अशीच स्वच्छता मोहीम आपल्या गावात राबवली पाहिजे असे बोलताना सांगितले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच विकास भांगरे.ग्रामपंचायतीचे कर्मचारी वाळू बांगरे व गावातील ग्रामस्थ गोरख भांगरे, शीला भांगरे, गिरजाबाई भांगरे, कौसाबाई दराडे,सुनील पोटे,गणपत भांगरे, भुरका भांगरे, गावातील एकल महिला,तरुण युवक शालेय विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला.
