कोळवाडे येथील हरघर नळ योजना उद्घाटन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे झालेले आहेत व काही सुरू आहेत कोळवाडे शिरापूर या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ व भूमिपूजन आणि पाणीपुरवठा योजने अंतर्गत घरोघर नळ योजने चे उद्घाटनचा कार्यक्रम संपन्न झाला आ. बाळासाहेब थोरात व माजी.आ.डाॅ.सुधीर तांबे यांच्या शुभाहस्ते नळ पाणी पुरवठा योजनेच्या घरगुती नळ जोडणी कामाचा शुभारंभ तसेच पिंपरणे-कोळवाडे-शिरापुर या जोड रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जय हिंद आश्रम शाळेच्या मुलींच्या स्वागत गीताने झाली
https://youtu.be/Vfd7ai5cxyc?si=mQlQEeBbO7oQryRV
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ गोंधे होते यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे,  पं.स.सदस्य विष्णुपंत राहटंळ, संचालक शेतकी संघ भाऊसाहेब नवले,
नानासाहेब गुंजाळ, जयहिंद आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे, सरपंच पुष्पाताई गुंजाळ, उपसरपंच बाबुराव गोंधे सोपान वर्पे, राजेंद्र देशमुख, दादाभाऊ देशमुख, अमोल वाकचौरे, बाळासाहेब राहणे, किसन पानसरे, रामेश्वर पानसरे, ग्रामसेवक संजय वामन, योगेश गुंजाळ आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. दशरथ वर्पे सर यांनी प्रास्ताविकात बाळासाहेब थोरात यांनी गावात केलेल्या कामांचा आलेख वाचून दाखविला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळे व तुषार गुंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास गुंजाळ यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!