तवांग येथे रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देणारा पोखरी हवेलीच्या सौरभ घुले चा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
 अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे राष्ट्रीय रस्सीखेच  स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक जिंकले. एकूण 18 राज्यातील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.विजेत्या महाराष्ट्र संघामध्ये पोखरी हवेली येथील  सौरभ बाळासाहेब घुले याचा सहभाग होता. या यशाबद्दल  पोखरी हवेली ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच सोमनाथ थिटमे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे,उपाध्यक्ष संदीप खैरे,सोसायटीचे माजी चेअरमन बाबासाहेब गवांदे,नानासाहेब घुले,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णा गवांदे,ग्रामपंचायत सदस्य कार्तिक ठोंबरे,महेश उदमले,छावा संघटनेचे दिनकर घुले,बाळासाहेब घुले,कविता घुले,सुनिता घुले,एकनाथ थिटमे,ज्ञानेश्वर घुले आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
.       सौरभचे यश निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन घुले यांनी काढले.उपस्थित सर्वांनीच सौरभचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सौरभने रस्सीखेच स्पर्धेतील यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करीत या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले.संघाचे कोच सय्यद सर,मार्गदर्शक शिक्षक निवृत्ती घुले व बाबा गायकवाड यांचे सौरभला मार्गदर्शन लाभले.सौरभचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
.         सरपंच सुदाम खैरे व मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेब पावसे,सुरेश साळुंके,दस्तगीर शेख, शकुंतला शेळके,सखाराम पाटील,राजेंद्र सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!