चंदनेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा थायलंडमध्ये नृत्य स्पर्धेत डंका 

थायलंड (बँकॉक) येथे ८ ते १० गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व ५ ते ७ च्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल गावात भव्य मिरवणूक 

सनई,ढोल ,ताशांच्या गजरात व जे.सी.बीच्या साह्याने विजेत्या संघावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

 

चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नृत्याच्या संघाने थायलंड (बँकॉक) येथे ८ ते १० गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व ५ ते ७ च्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ चंदनापुरी आयोजित भव्य मिरवणुकीत चंदनापुरी व चंदनापुरी पंचक्रोशीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

यावेळी सनई,ढोल ,ताशांच्या गजरात व जे.सी.बीच्या साह्याने विजेत्या संघावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक खेमनर, नृत्य कला शिक्षक विश्वजीत देशमुख सर व श्री.राहणे के.जी सर व सर्व विजेत्या खेळाडूंचा यावेळी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे संगमनेरचे तहसीलदार श्री.धीरजजी मांजरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हटले की ज्यामध्ये माणसाला आवड असेल त्या क्षेत्रामध्ये आपण उज्वल केले पाहिजे. जर ना आवड असेल तर माणूस कारणे शोधतो त्यासाठी त्यांनी एक बोधकथा सांगितली. म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रोत्साहित केले पाहिजे त्यासाठी त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले. मीही शिक्षकाचा मुलगा असून तेव्हा एम.पी.एस.सी.च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो त्यावेळेस गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता व दिवसभर माझी मिरवणूक चालली होती हा क्षण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात येऊ शकतो त्यासाठी अपार कष्ट व प्रामाणिकपणा असणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी त्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच यावेळी पावसाळी तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार श्री एम एम फटांगरे सर यांनी पालकांच्या व संस्थेच्या सहकार्यामुळे विद्यार्थी परदेशात जाऊन चंदनेश्वरचा झेंडा शकले हे सर्व यश मदत करणाऱ्या देणगीदारांचे, पालकांचे व शिक्षकांचे आहे.
यावेळी प्राचार्य श्री अशोक खेमनर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र डूबे श्री बांगर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!