चौथची सई शरद बनकर हिने स्केटिंग वर चार ते पाच तास नृत्य
माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरामध्ये आदर्श पब्लिक स्कूल या स्कूलमध्ये आजादी का अमृत महोत्सवा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी इयत्ता चौथीत शिकणाऱ्या सई शरद बनकर हिने स्केटिंग वर चार ते पाच तास नृत्य केल्याबद्दल आदर्श पब्लिक स्कूलमध्ये तिचे कौतुक करण्यात आले व माढा तालुक्यातील संजय मामा शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुंभार आशीर्वाद साहेबांनी ही तिचं कौतुक करून ती सत्कार करण्यात आला .
सई शरद बनकर लहान वयोगटातील मुलगी आहे. आदर्श पब्लिक स्कूल चे खारे सर यांनी सई बनकर यांचे आई-वडील मदतीने स्केटिंग चे प्रॅक्टिस करून घेतली आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक अमोल सुरवसे व सुरवसे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
रोपळे गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ व अनेक गावातील मान्यवर तिला शुभेच्छा देत आहेत ….
