Ai आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेडिंग फोटोग्राफी कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न..
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
Ai आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेडिंग फोटोग्राफी कार्यशाळा आज नाशिक मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी व ॲण्ड सिनेमॅटोग्राफी व नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफीचे मा. क्षितिज संजय जाधव सर यांनी वेंडिग Ai विषयावर प्रात्यक्षिकासह सखोल असे मार्गदर्शन केले एकुण १०० छायाचित्रकार बंधु – भगिनींनी यात सहभाग नोंदवला होता.HRD सेंटर येथे हे वर्कशॉप संपन्न झाले. खुप छान संकल्पना व मार्गदर्शन मिळाले, अशी भावना यावेळी उपस्थित प्रत्येक छायाचित्रकारांनी मांडली.
कार्यक्रम यशस्वीते साठी छायाचित्रकार प्रताप पाटील, प्रशांत तांबट,किरण मुर्तडक,सुनिल जगताप, तुकाराम गांगुर्डे, सौरभ अमृतकर, संदिप भालेराव, रविंद्र गवारे , महादेव गवळी, आदिने परिश्रम घेतले
तर अध्यक्ष संजय जगताप यांनी आभार प्रदर्शन केले..

