यशस्वी होण्याकरिता गरुडासारखे गुण संपादन करावे- संदीप भानोसे

 

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार

30 – 40 वर्षांपूर्वी नाशिक हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. परंतु आज मात्र मुंबई प्रमाणे सतत पंख्याचा वापर करावा लागत आहे. कारण विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची झालेली कत्तल . शालेय जीवनापासूनच हरितसंस्कार करणारी हिरवांकुर फाउंडेशन – वृक्ष लावा – वृक्ष जगवा हा संस्कार करणे अतिशय महत्त्वाचे आहे . गरुड हा पक्षांचा राजा आहे व तो आपल्या स्वतःमध्ये अनेक गुण विकसित करतो असेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःमध्ये चिकाटी, सकारात्मकता ,धाडस , कृतिशीलता ,नियोजनक्षमता , वेळेचे भान , निर्णय क्षमता असे गुण विकसित केले पाहिजे असे प्रतिपादन संदीप भानोसे यांनी केले

वृक्ष उत्सव 2023 मध्ये शासकिय माध्यमिक कन्या विद्यालय Government Girl’s School मधील ज्या ज्या विद्यार्थीनींनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन सुंदर सादरीकरण केले त्यां सर्वांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर हिरवांकुर फाउंडेशनच्या अध्यक्ष नलिनी शहा , राखी शहा, प्रीती चौधरी ,संदीप भानोसे व रवींद्र पाटील तसेच शाळेच्या नेहा शिरोळे व कविता साठे उपस्थित होते. प्रीती चौधरी यांनी हिरवांकुर फाउंडेशनच्या विविध योजनांची माहिती सांगितली
यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन श्रीमती संगीता सोनार यांनी केले.अतिथी परिचय श्रीमती कविता साठे यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.नेहा शिरोरे यांनी आभार प्रदर्शन केले .
नेहा शिरोळे ताईंचा सत्कार श्री पाटील यांनी झाडाचे रोप देऊन केला. तसेच कविता साठे ताईंना झाडाचे रोप देऊन नलिनीताई व राखी ताईंनी गौरविले .200 अधिक विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!