वाचन प्रतिज्ञाने पेटिट विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांना अभिवादन

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज

 

मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यांच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड पुन्हा निर्माण करायची असेल तर विद्यालय व महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन दररोज साजरे व्हायला हवेत. निमित्त होते शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी. एम. पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळ सत्रात विद्यालयात तर दुपारच्या सत्रात जुनिअर कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्याचे
संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य निकम सी.एन. यासह अधीक्षक तथा पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड, प्रा. परेश सांगवीकर प्रा. दशरथ गभाले आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे प्राचार्य निकम यांनी पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी सोहम शेटे, ईश्वर खरात, जयदीप थिटमे, दीक्षा अनोळख या विद्यार्थ्यांनी वाचन करून डॉ. अब्दुल कलाम यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अस्मिता देशपांडे , प्रा. गुलाब गायकवाड, प्रा. श्रीमती शिंदे एस. व्ही यांनीही डॉ अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून पटवून दिले. यावेळी १२वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घोषवाक्यांच्या फलकांद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रा भाऊसाहेब मांढरे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वाचन प्रतिज्ञा दिली. अध्यक्ष भाषणात प्राचार्य निकम सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खूप मोठी स्वप्न बघावी. मात्र स्वप्न बघत असताना ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांचे अनुकरण करावे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांचा वापर टाळावा. वाचनानेच माणूस मोठा होतो हे पटवून देण्यासाठी प्राचार्य निकम यांनी विद्यार्थ्यांना अनेक दाखले दिले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन १२ वी विज्ञान चे वर्गशिक्षक प्रा. अमोल टेमक यांनी केले होते. सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे नियोजन ६ वी अ / ब वर्गाचे वर्गशिक्षक श्री किशोर बांडे, श्रीमती अश्विता किनगे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवजिनाथ गायकवाड, ईश्वरी जाधव, आयुषी वर्पे या विद्यार्थिनी केले. कार्यक्रमाचे आभार वर्गशिक्षक प्रा. अमोल टेमक यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल सांगळे के. के, सत्र प्रमुख प्रकाश वनम , अमोघ कुलकर्णी, संतोष धुळे, माणिक भडांगे , यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!