रयतच्या ,रयत संकुल सात्रळने नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पताका फडकवली

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज अशोक गोसावी

 

नेपाळ येथे झालेल्या इंडो नेपाळ युथ इंटरनॅशनल गेम्स मध्ये चॅम्पियन २०२३ च्या मैदानी व वैयक्तिक खेळात काठमांडू रंगशाला स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ ता.राहुरी या संकुलाने माध्यमिक व ज्युनियर विभागाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर रयत शिक्षण संस्थेचे व रयत संकुल सात्रळचे नाव पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पटलावर कोरले.
ही उल्लेखनीय कामगिरी करणारा इयत्ता ११ वी चा विद्यार्थी राहुल प्रकाश शिंदें याने १७ वर्षाच्या वयोगटात लांब उडीत उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले.तसेच इयत्ता १० वी चा विद्यार्थी अथर्व जालिंदर बनगयें याने १४ वर्षाच्या वयोगटात रनिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा.पी.पी.सुर्यंवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रा.विलास दिघे,जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशिनकर,केशवराव मुसमाडे, युनुस पठाण,सचि्दानंद झावरे, भारत कोहकडे,संजय दिघे,प्रकाश कुलथे, विलास गभाले,ज्ञानदेव लेंडे, वैभव वसावे सतिश नालकर, शिवदास सातपुते, देविदास थोरात, जालिंदर बनगये, प्रमिला पंडोरे, संगिता सांगळे, सुनिता ढोकणे, गिताजंली गोसावी प्रांजली फरकाडे,प्रा.अर्चना बनसोडे,पल्लवी गावडे,प्रविणाताई दिघे कावेरी वदक, पंकज दिघे,प्रा.सतिश कदम,प्रा.आण्णासाहेब गोर्डे,प्रा.किशोर दातीर प्रा.विश्वास घुगे, सुदर्शन गिते, रत्नाकर सोनवणे आदिंचेही खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजी तापकीर, प्रगती पतसंस्थेची चेअरमन ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू, संभाजीराजे चोरमुंगे, भास्करराव फणसे, पत्रकार किशोर भांड,के.के.बोरा, शांतीभाऊ गांधी, युवानेते किरण कडू, पंकज कडू , विक्रांत कडू, मा.सरपंच गणेश कडू, प्राचार्य राजेंद्र.बी.बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात,भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक, विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!