छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीबाबत निश्चितपणे पुढाकार घेवू – विखे पाटील

संगमनेर / लोकवेध / live न्यूज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीबाबत निश्चितपणे पुढाकार घेवू आशी ग्वाही महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनीर्वाण दिनानिमित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जावेदभाई जहागिरदार अमोल खताळ शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ कानकाटे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आबासाहेब थोरात युवकचे अध्यक्ष कपिल पवार राहूल भोईल प्रांताधिकारी शैलेश हिंगे तहसिलदार धिरज मांढरे मुख्याधिकारी वाघ गटविकास अधिकारी‌ नागणे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाजाच्या उन्नतीसाठी संविधानाच्या माध्यमातून केलेले कार्य खूप मोठे आहे.समाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराने काम करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

अभिवादन कार्यक्रमानंतर मंत्री विखे पाटील यांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी भेट घेवून छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रमाणेच भाररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली.याबाबत निवेदन देवून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या समवेत चर्चा केली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारून त्यांच्या विचारांची प्रेरणा सतत मिळत राहाण्यासाठी केलेल्या निर्णयापर्माणेच भाररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभारण्यासाठी योगदान दिल्याचे मलाही समाधान वाटेल असेही विखे पाटील म्हणाले.

यासंदर्भात सकारात्मक निर्णय करण्याची तयारी असल्याची ग्वाही देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की,याबाबत अधिकर्यांनी जागेची पाहाणी करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!