पेटिट विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टी डी एफ चे शिक्षक नेते हिरालाल पगडाल, शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष बबनराव जगताप, इन्चार्ज प्रा गुलाब गायकवाड उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. एन निकम होते . प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. हिरालाल पगडाल बोलताना म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी दलितांशिवाय सर्वच जनतेसाठी काम केले आहे. शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र त्यांनी जनतेला दिला. अध्यक्ष भाषणात प्राचार्य निकम म्हणाले की, शिक्षणातूनच सर्वांचा विकास होतो. यासाठी सर्वांनी चांगले शिक्षण घ्यावे. पाहुण्यांचा परिचय इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड, प्रास्ताविक प्रा. दशरथ गभाले, सूत्रसंचालन गायत्री गवांदे, धनश्री वाघमारे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्रा. रूपाली देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा परेश सांगवीकर, प्रा स्वप्निल शिंदे, प्रा भाऊसाहेब मांढरे, प्रा अमोल टेमक, प्रा सुनिता शिंदे, प्रा सुशीला चिमणकर, प्रा सिमिका मिश्रा, प्रा उषा जाधव श्री संतोष धुळे, ग्रंथपाल सांगळे के के, श्रीमती मनीषा खाटेकर आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!