जायनावाडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे उत्साहात स्वागत.

पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ दुर्लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आलेली आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडील प्राप्त आदेशानुसार अकोले तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या जायनावाडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे ग्रामपंचायतीच्या वतीने अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथाचे गावात आगमन झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच,सदस्य ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी,शिक्षक,आरोग्य विभागाचे कर्मचारी,गावातील ग्रामस्थ महिला बचत गटाच्या सदस्या, ग्रामस्तरावरील कार्यरत सर्व कर्मचारी व शालेय विद्यार्थी यांनी स्वागत केले. चित्ररथाला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक बापूसाहेब राजळे यांनी केले.जि.प. प्रा.शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते सरस्वती देवी , छत्रपती शिवाजी महाराज,आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या देशव्यापी मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील करावयाच्या कार्यक्रमांतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत झाल्यानंतर माननीय पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले व विकसित भारत संकल्प प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच ‘मेरी कहानी मेरी जुबानी’अंतर्गत ग्रामविकास,कृषी,आदिवासी विकास विभाग आदी विभागांच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींचे अभिप्राय घेण्यात आले.यामध्ये पांडुरंग भांगरे, काळू भांगरे,किसन पेढेकर यांनी योजनेच्या लाभाबाबत मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हस्ताक्षर स्पर्धा,निबंध स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. महिला बचत गटातील महिला सदस्यांनी समूहगीत सादरीकरण केले. कार्यक्रम स्थळी महिला बचत गटाच्या वतीने विविध प्रकारची कडधान्य, तृणधान्य व भाजीपाला पिके यांचा स्टॉल लावण्यात आलेला होता. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी शिक्षण विभागाकडील कामकाजाबाबत व योजनांबाबत माहिती दिली.ग्रामविकास विभागाकडील योजनांबाबत ग्रामसेवक बापूसाहेब राजळे,कृषी विभागाकडील योजनांबाबत कृषी सहाय्यक अरुण बांबेरे,आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक बाळासाहेब यादव त्याचप्रमाणे तलाठी जालिंदर गाणे यांनी उपस्थितांना माहिती दिली.याप्रसंगी ऍडव्होकेट राजाराम बेंडकोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच गोरख भांगरे यांनी कृषी विभागाच्या काही योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.
सदर कार्यक्रम स्थळी विकसित भारत संकल्प यात्रा कॅलेंडरचे मान्यवरांच्या व उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड पाच लक्ष रुपयापर्यंतचा आरोग्य विमा या कार्डाचे प्रतिनिधीक स्वरूपात अशोक भांगरे यांना कार्ड वितरण करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळू डगळे,उपसरपंच मनीषा भांगरे,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे,वनिता पेढेकर,कार्यक्रम नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे,ग्रामसेवक बापूसाहेब राजळे,तलाठी जालिंदर घाणे,शिक्षक सोमनाथ गोडे,कृषी सहाय्यक अरुण बांबेरे,आरोग्य विभागाचे डॉ.मोरे मॅडम,आरोग्य सेवक बाळासाहेब यादव,आरोग्य सेविका ज्योती केदार,ऍड.राजाराम बेंडकोळी , काळू भांगरे,गोरख भांगरे,संदीप भांगरे,सोमनाथ भांगरे,पांडुरंग भांगरे,किसन पेढेकर,संपत भांगरे,नवनाथ पेढेकर,रामभाऊ भांगरे, अशोक भांगरे,पंढरीनाथ भांगरे, रामदास भांगरे,बाळू मेंगाळ,सुनील भांगरे,निवृत्ति भांगरे,हिरामण भांगरे,विठ्ठल भांगरे,महिला बचत गटाच्या कावेरी भांगरे,आशा कार्यकर्ती सोमाबाई सुकटे,जनाबाई भांगरे,सगुणाबाई भांगरे,महिला बचत गटाच्या सदस्य,महिला व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळू भांगरे यांनी केले व गोरख भांगरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!