सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य. विद्यालय, शेडगाव येथे सावित्री बाई जयंती सोहळा व बालिका दिन व बाल आनंद मेळावा संपन्न

सिनेअभिनेत्री नित्य लक्ष्मी (प्रिंयका) नागरे यांच्या उपस्थितीत संपन्न


शेडगाव  / लोकवेध Live न्यूज / भाऊसाहेब फड विशेष प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयात नव्या वर्षातील पहिला उत्सव….
३ जानेवारी २०२४ बुधवार सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला


शेणा,दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म अन्याय अत्याचार विरोधी लढा जुन्या रूढी परंपरा यांना मूठ माती देऊन समाजातील महिलांना पुढे नेण्याची अवघड वाट सावित्री माई चालत राहिली म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात आपली प्रशस्त प्रगतीची वाट तयार झाली….


सावित्रीबाई फुले जयंती सोहळा व महिला मुक्तीदिनानिमित्त व बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी खास प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट अभिनेत्री नित्य लक्ष्मी (प्रियंका) नागरे आपले मानवाधिकार प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य सचिव मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती रेणुका दिघे मॅडम तसेच केंद्र प्रमुख श्री घुले साहेब या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची व त्यागाची माहिती दिली अन्याय व अत्याचार विरुद्ध संघर्षाने उभे राहून स्वाभिमानाने स्वावलंबी होण्यासाठी मुलींना आव्हान केले व आनंद मेळाव्याच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या सहभागातून आनंदमय वातावरण तयार केले.

प्रमुख अतिथी व ग्रामस्थ यांनी शालेय उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले याप्रसंगी शेडगाव सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ व महिला व पालक आणि स्थानिक स्कूल कमेटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी सोसे सर व शिक्षक
शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी पालक माता भगिनी. ग्रामपंचायत . सोसायटी . दुधसंस्था बचत गट.आदी पदाधिकारी. विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!