विश्व वंजारी साहित्य परिषद यांच्या वतीने पहिला वर्धापन दिन व दुसरे विश्र्व वंजारी साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने संपन्न….

संगमनेर / लोकवेधlive न्यूज / भाऊसाहेब फड विशेष प्रतिनिधी

विश्व  वंजारी साहित्य परिषद यांच्या वतीने रविवारी दिनांक ३१/१२/२०२३ सकाळी १०ते ५वाजेप्रर्यत ऑनलाईन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम वर्धापनदिन व व्दितीय विश्र्व वंजारी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले
यात विविध संपुर्ण महाराष्ट्रातुन प्रकारच्या कविता लेख माहिती आपले विविध प्रकारचे विविध विषयांवरील आपले विचार पाठवण्यात आले होते
व सहभागी सर्वांना समाजभूषण पुरस्कार २०२३ सन्मानप्रत्र व सन्मान चिन्ह ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले
विश्व वंजारी साहित्य परिषद” व्हाट्सअप, फेसबुक समूहात दि.३१ डिसेंबर.२०२३ रोजी सकाळी १०:००ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या ऑनलाइन अर्थात अंतर्गजालवर समुहाचा “प्रथम” वर्धापन दिन व “द्वितीय” विश्व वंजारी साहित्य संमेलन निमित्त उपस्थित साहित्यिक,वाचक रसिक,मान्यवरांनी
नामोल्लेखासह माझ्या तमाम साहित्यिक माता, भगिनी पितृतुल्य ज्येष्ठ साहित्यिक,पासून तर नवोदित साहित्यिकांपर्यंत, वाचक रसिक मान्यवर हितचिंतक, या क्षणापर्यंत परिश्रम घेणारे मित्र बंधू आणि रसिका हो
आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतोनात परिश्रमाने अनमोल आशीर्वादाने हे सर्व शक्य झाले आहे..
सर्वांचाच नामोल्लेख करणे या क्षणी अशक्य आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष
श्री.शरद गोरे सर यांचा परिचय आपणा सर्वांस आहेच, गुरुवर्य मार्गदर्शक प्रमुख पाहुणे म्हणून आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली आम्ही आभारी आहोत.
आदरणीय श्री.धनराज गुट्टे सर आपले मोलाचे सहकार्य लाभले हे कधीच विसरू शकत नाही..
सन्माननीय डॉक्टर अलकाताई नाईक (माई) यांनी वेळोवेळी कार्यक्रम होण्यासाठी बहुमूल्य वेळ काढून मार्गदर्शन केले आहे.
साहित्य सोळ्याच्या उद्घाटक
ज्येष्ठ कवयित्री वैजयंतीमाला मदने(माई) अध्यक्षा- किरण ताई मोरे, ज्येष्ठ साहित्यिक मावळते अध्यक्ष श्री नागनाथ बडे(नाना)
स्वागताध्यक्ष समाजसेवक श्री. प्रशांत आंधळे सर, आणि
ज्यांनी सर्वोत्कृष्ट पद्धतीने ग्राफिक्स, व्हिडिओ, युट्युब वर कार्यक्रमाचे प्रसारण,
केले असे गीतकार/ गायक श्री.सोनवणे सर, तसेच (प्रसार माध्यम व मिडिया)या मार्फत प्रसिद्धी मा श्री समाजभूषण व कवीवर्य भाऊसाहेब फड, यांनी नियोजन केले
तर २०२४ मधील विश्र्व वंजारी साहित्य परिषद संमेलन कार्यक्रम आमच्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आदिशक्ती जगदंबा माता मंदिर पावन भुमी मध्ये श्रीतिर्थ श्रेत्र ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य येथे आमच्या आदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान व विश्र्व वंजारी साहित्य परिषद संयुक्त रीतीने घ्या,
सर्व जबाबदारी स्विकारतो अशी घोषणाच केली.)
सर्व साहित्यिकांनी आज अगदी वेळात वेळ काढून हजेरी लावून जीव तोडून अगदी अंत:करणातून काव्यरचना व इतर साहित्य पाठवले आहे आपले कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करत आहोत, आपल्यामुळे साहित्य सोहळा हा यशस्वीतेपर्यंत पोहोचला..
आज मला असं झालंय की कुणाकुणाचे आभार मानावे तेच कळत नाही. कारण सर्वांचे योगदान या साहित्य सोहळ्यात लाभले याचा विशेष आनंद होतो.
आज मला हे पण समजलं की अंग मेहनतीच्या ऑफलाइन कार्यक्रमा प्रमाणे ऑनलाइन कार्यक्रम सोहळा टेक्निशियन दृष्टिकोनातून आव्हानात्मक असतो…. कार्यक्रम सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर
व्हाट्सअप वरती आलेल्या सर्व मान्यवरांच्या लेखी, व्हिडिओ, , साहित्य ,शुभेच्छा हे सर्वांगीण बाबतीत आपापल्या संस्थेच्या परिषदेच्या मंचाच्या फेसबुक पेजवर समूहात जतन करावी लागते. जेणेकरून हा सोहळा आपल्याला वर्षानुवर्ष आपल्याला अनुभवता येईल बघता येईल यामधून आपल्याला शिकता येईल. भविष्यात घेणार असलेल्या कार्यक्रमात अनुभवानुसार योग्य नियोजन करता येईल.
सर्व सारस्वतांनी मिळून मिळून एकमेकांच्या साहित्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली हे इथे महत्त्वपूर्ण ठरते.
2023 चा आजचा शेवटचा दिवस. . आणि उद्या 2024 या नवीन वर्षाचा चा प्रथम दिवस. .
येणाऱ्या नवीन वर्षामध्ये जसे जमेल तसे ऑनलाइन किंवा ऑफलाइन
संमेलन भरवत राहूया. . .
एका वर्षात परिषदेचे संस्थेचे किती संमेलन व्हावे याला काही बंधन नाही. . जो जो जशी जबाबदारी स्वीकारेल जो जो इच्छुक असेल मग ते ऑफलाइनची जबाबदारी असो किंवा ऑनलाईन ची जबाबदारी असो आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे सत्कार्य करत राहूया आणि सक्षमीकरण संगोपन करून
माय मराठी मातृभाषेची सेवा करत राहूया.. संस्थेला संस्था जोडत राहूया, एकमेकांच्या संयुक्त रीतीने असे साहित्य सोहळे आर्थिक बाबतीत परिपूर्ण होऊन, तथा सर्वांच्या सहकार्याने, शारीरिक परिश्रमाने पार पाडत राहूया..
वेळ अभाव, आर्थिक बाब, परिश्रमासाठी मनुष्यबळ याची अपूर्णता, कमतरता या कारणाने असे संमेलन ऑनलाईन घ्यावे लागतात, हे इथे सत्य इथे स्वीकारलेच पाहिजे..
भविष्यात ऑफलाईन प्रत्यक्ष
साहित्य सोहळे ,
ग्रामीण भागात तथा शहरात आपण हॉलमध्ये होतील,हा सकारात्मक विचार करूया..
आणि महत्त्वाचे म्हणजे जे साहित्यिक एकमेकांच्या जवळपास राहतात त्यांनी हेवी दावे भेदभाव विसरून सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक म्हणून सर्व मिळून एकत्रआले पाहिजे, ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे..
अशा कामास कोणासही जबरदस्ती करून जमत नाही..श्वेच्छेने जे अशा
सत्कार यामध्ये सहभाग घेतील त्यांचे स्वागतच आहे…. जर आपापल्या परिसरामध्ये विविध कार्यक्रम होत असतील तर सामाजिक विभाग तथा राजकीय विभागाने मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून स्पॉन्सरशिप देण्यास हवी बहुतांशी हे कर्तव्यच म्हणावे लागेल, हा एक राजश्रयाचा मुद्दा आहे.
सर्वांनी २०२४ या वर्षात निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून, आणि पुन्हा एकदा आपल्या कार्यकारणी सह वतीने आभार व्यक्त करत आहोत
मा. सौ.सुरेखाताई शिरसाठ राष्ट्रीय अध्यक्षा
मा.श्री.रमेश केदार
राष्ट्रीय सरचिटणीस
मा.डॉ.अनिल सांगळे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष
मा श्री भाऊसाहेब फड
राष्ट्रीय प्रसिद्धी व मिडिया प्रमुख
यांच्या सह अनेक पदाधिकारीनी विशेष रात्र दिवस अतिशय परिश्रम घेतले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!