पिंपरणेत विविध संस्थाच्या वतीने सहकार महर्षी स्व भाऊसाहेब थोरात जयंती साजरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
तालुक्याच्या विकासात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची मोलाची भूमिका राहिली असून त्यांनी सहकार, शिक्षण, कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. सर्व सामान्यांचे जीवन सुखी व्हावे यासाठी अमृत उद्योग समूहाची उभारणी करुन त्यांनी खर्या अर्थाने सहकारातून समृद्धता आणली.
शिक्षणाची लोकगंगा संगमनेरमध्ये पोहोचवली आणि संगमनेरच्या माळरानावर ज्यांनी नंदनवन उभे केले, ते कर्मवीर भाऊसाहेब संतुजी थोरात यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील छत्रपती चौकात मोठ्या जल्लोषात शुक्रवार दि ११ रोजी साजरी करण्यात आली यावेळी सरपंच नारायण मरभळ शिवराम वाकचौरे काकासाहेब गायकवाड राजेंद्र देशमुख अरुण देशमुख दादासाहेब देशमुख ,अजित देशमुख, कैलास काळे संजय बागुल, उत्तमनाना रहींज अण्णा राहिंज, विनोद साळवे गंगाराम वाकचौरे, बाबासाहेब राहिंज, ज्ञानदेव राहींज, भीमा राहिंज निलेश बागुल गोरक्षनाथ कर्पे पोपट साळवे, सुरेश ठोंबरे प्रदीप देशमुख सचिन राहींज रमेश राहिंज सुरेश कर्पे बाळासाहेब ठोंबरे उमाजी जोर्वेकर दत्तू वाकचौरे किसन साळवे कृष्णा काळे आदी उपस्थित होते
संगमनेरच्या माळरानावर स्व भाऊसाहेब थोरात यांनी सहकारी साखर कारखाना उभारला.. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले आणि देशपातळीवर नावाजले गेलेले अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राजहंस दूध प्रकल्प या सगळया विकासकामांच्या घोडदौडीमुळे आज संगमनेर हे एकेकाळचे दुष्काळी गाव महाराष्ट्रात विकासात आघाडीवर आहे.निळवंडे धरण बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्याने उभे राहिले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेती पाण्याखाली आली. शेतक-याला सुबत्ता आली, शिक्षणाची सोय झाली. दूध प्रकल्पामुळे जोडधंदा मिळाला.
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत तसेच गावातील कामधेनु दूध संस्था छत्रपती दूध संस्था कुलस्वामी दूध संस्था संत गगनगिरी दूध संस्था, पिंपरणे सोसायटी सर्व संस्थातील चेअरमन व्हा चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद व ग्रामस्थ यांच्यावतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
