सकल मराठा समाजाच्या पाठपुराव्यामुळे झोळे येथील स्व.सागर वाळे याच्या कुटुंबाला महायुती सरकारमुळे मिळाली 10 लाख रुपये मदत !

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

झोळे येथील स्व. सागर भाऊसाहेब वाळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. आरक्षणासाठी वाळे कुटुंबाने आपला मुलगा गमविला होता. त्याच्या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून संगमनेर येथील सकल मराठा समाजाच्या समन्वयक राजाभाऊ देशमुख, शरद नाना थोरात, अमोल कवडे, प्रशांत वामन, अमोल खताळ पाटील, रमेश काळे, खंडू सातपुते, सौरभ देशमुख व मराठा बांधवांनी शासनाकडे केली होती. महायुती सरकारच्या वतीने 10 लाख रुपयांचा धनादेश आज कुटुंबाला मिळाला.

याप्रसंगी राहुल वाळे यांनी सकल मराठा समाजाने केलेल्या प्रयत्नामुळे आम्हाला आर्थिक मदत मिळाली त्याबद्दल त्यांनी मराठा समाजाचे व महायुती सरकारचे आभार मानले.

धनादेश कुटुंबाला मिळाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने श्री. राजेंद्र देशमुख, अमोल कवडे, अमोल खताळ पाटील, अशोक कानवडे, सुयोग गुंजाळ, मधुकर वाळे, बंडू वाळे, माधव वाळे, रंगनाथ दादा खर्डे, पोपट एरंडे, गिरीश एरंडे, संपत वाळे, दिलीप वाळे यांनी स्व. सागरचे वडील भाऊसाहेब वाळे, आई राजश्री वाळे, भाऊ राहुल वाळे यांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!