कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

कॉ. पी.बी कडू पाटील फाउंडेशन सात्रळ ता.राहुरी जि. अहमदनगर यांच्या विद्यमाने दिला जाणारा कॉ.पी.बी कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार नेत्र विशेषज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. सेवाभावी,त्यागी व निरपेक्ष वृत्तीने अविरत समाजकार्य करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कॉ. पी.बी. कडू पाटील यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो.याच विचाराने प्रेरित झालेल्या व समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.या पुरस्काराचे वितरण भारत सरकार निर्मलग्राम पुरस्कारा विजेते व महाराष्ट्र सरकार आदर्श गाव पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन मा.आ.पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १९जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वा.रयत शैक्षणिक संकुल सात्रळ ता.राहुरी जि.अहमदनगर येथे संपन्न होणार असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कॉ.पी.बी कडू पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी दिली आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग, अहमदनगर यांच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका व गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेअहवान रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षअरुण कडू पा, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचेअध्यक्ष,आ. आशुतोषदादा काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,ॲड.विजयराव कडू विक्रांत विजयराव कडू,अतुल विजयराव कडू,राहुल विजयराव कडू, डॉ.विलासराव कडू,मिलिंद विलास कडू,किरण पा. कडू,पंकज कडू पा.यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!