पिंपरणे शाळेचे मुख्याध्यापक संजय बोर्से दिव्यांग गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
जागतिक दिव्यांग दिनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग सरकारी आधिकारी व कर्मचारी संघटना यांचे वतीने दरवर्षी दिव्यांग गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय बोर्से यांना यांना देण्यात आला.
५ डिसेंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.संभाजीराव लांगोरे,शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांचे शुभहस्ते शिक्षक नेते बापुसाहेब तांबे,बबनराव गाडेकर,आबा लोंढे दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव अनाप,कार्याध्यक्ष राजु आव्हाड,सचिव पोपट धामणे,राज्य कोषाध्यक्ष संतोष सरवदे,मुख्याध्यापक संघटनेचे राज्यउपाध्यक्ष दत्तात्रय जपे,दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर लहामगे,लक्ष्मण पोकळे, सचिन रणाते ,पेन्शनर संघटनेचे द.मा.ठुबे गुरुजी यांचे उपस्थितीत संजय बोर्से यांना पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले.मुख्याध्यापक संजय बोर्से सर हे आपल्या शाळेमध्ये आपले सहकारी शिक्षकवृंद,पालक व ग्रामस्थ तसेच गावातील पदाधिकारी यांचे सहकार्याने विविध उपक्रम राबवुन विद्यार्थी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्याचा प्रयत्न करत असतात.शालेय भौतीक सुविधा, शालेय शिस्त,पालक व ग्रामस्थ तसेच गावातील पदाधिकारी यांचे सहकार्याने वृक्षारोपन,शालेय परिसर सुशोभिकरण,भौतिक सुविधा व विविध शालेय सहशालेय उपक्रम तसेच शालेय शिस्त यामुळे शाळेची पटसंख्या देखील चांगली आहे.शासनाच्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी यामुळे शाळेची गुणवत्ता टिकुन आहे. महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेच्या माध्यमातुन देखील संजय बोर्से सामाजीक व शैक्षणिक उपक्रमात सक्रीय असतात.त्यांच्या कार्याची दखल घेऊन जागतिक दिव्यांगदिनी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पिंपरणे ग्रामपंचायत,विविध कार्यकारी सोसायटी,रणजित दादा देशमुख स्पोर्ट कल्ब पिंपरणे तसेच गावातील विविध संस्था,पदाधिकारी,पालक व ग्रामस्थ यांचे वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
मा.महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,सुधीर तांबे,राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख गटविकास अधिकारी अनिल नागणे,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड,शिक्षणविस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे,अशोक गोसावी, राजेंद्र भालारे,केंद्रप्रमुख पार्वती गाडेकर तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना,शिक्षक बॅंकेच्या वतीने संचालक भाऊराव राहींज तसेच पिंपरणे केंद्रातील सर्व शिक्षकवृंद यांनी संजय बोर्से सरांचे अभिनंदन केले.
