ब्रेकिंग न्यूज : सहकार विभागाचा सहाय्यक निबंधक ‘एसीबीच्या’ जाळ्यात…
सिन्नर – लोकवेध live न्यूज 
येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांना आज (दि. 2) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान त्यांच्याच कार्यालयात 15 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पाथरे येथील एका पतसंस्थेच्या सेवकाने थकीत 17 कर्जदारांचे 101 चे वसुली दाखले मिळण्यासाठी पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते. पाटील यांनी प्रत्येक प्रस्तावाचे 2 हजार याप्रमाणे 34 हजारांची मागणी संबंधित सेवकाकडे केली होती.
तडजोडीनंतर 25 हजार 500 रुपये देण्याचे संबंधित सेवकाने मान्य करीत 26 फेब्रुवारीला 10 हजार रुपये पाटील यांना दिले होते. दाखले तयार झाल्यानंतर उर्वरित 15 हजार 500 रुपये देत नसल्याने पाटील यांनी दाखल्यांवर सही करण्यास नकार दिल्यानंतर संबंधित सेवकाने बुधवारी (दि. 1) लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर बुधवारी (दि.1) संबंधित सेवकाने पुन्हा पाटील यांची भेट घेऊन 1500 हजार 500 रुपये उद्या (दि.2) देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार आज (दि. 2) दुपारी सव्वा वाजेच्याच्या दरम्यान सरकारी पंचांच्या समोरच पाटील यांनी 15 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!