पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे ‘राष्ट्रिय युवा दिन’ उत्साहात साजरा

नाशिक / लोकवेध live न्यूज

स्वामी विवेकानंद म्हणत, ‘आपल्या जिवनाचे उद्दीष्ट आपल्याला कळले पाहिजे. ते कळण्यासाठी स्वत:ची ओळख झाली पाहिजे. ज्याने स्वत:ला ओळखले, त्याने परमात्म्याला ओळखले.’ एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात संन्यासी, स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येतो. विचार करायला लावतील, अशा प्रेरक विचारांची पेरणी करणारे स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी रोजी जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने हा दिवस`राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, त्यानिमित्त स्वामींच्या मौलिक विचारांची थोडक्यात उजळणी! राष्ट्रिय युवा दिनानिमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे १२ जानेवारी ते १८ जानेवारी हा कालावधी ‘ राष्ट्रिय युवा दिन’ म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंदांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे याकरता विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, श्रावणी कमुजू, विशाल मेंढे आणि समन्वयक शिक्षिका यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना, सुविचार, दिनविशेषनाच्या सादरीकरणातून स्वामी विवेकानंदांनचे विचार प्रस्तुत केले. विद्यालयातील विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंदांच्या कार्याची महती सांगितली. तसेच अन्य विदयार्थी व विद्यालयाचे संगीत शिक्षक यांनी आपल्या मधुर आवाजात स्वामी विवेकानंदांच्या कार्याशी संबंधित सुंदर गीत प्रस्तुत केले. विद्यालयातील इयत्ता ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग दर्शवला. त्यामध्ये प्रतिदिन विद्यार्थ्यांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जसे नृत्य , गायन यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मनमोहक पोस्टरांचे सादरीकरण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी योग केंद्राचे आयोजन करण्यात आले यादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली. अशारीतीने १८ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवातील विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थिनी इच्छा सुराणा हिने पार पाडले. या महोत्सवासाठी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!