पिंपरणे केंद्रशाळेत संगमनेर खुर्द बिटाच्या बिटस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा उत्साहात संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिंपरणे ता.संगमनेर येथे संगमनेर खुर्द बिटाच्या बिटस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
संगमनेर खुर्द बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी एकनाथ भांगरे,संगमनेर खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग घुले,पिंपरणे केंद्राच्या केंद्रप्रमुख पार्वती गाडेकर,देवगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख नंदा वलवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धांचे केंद्रमुख्याध्यापक संजय बोर्से व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकवृदांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

स्पर्धेच्या प्रारंभी पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते यांचे हस्ते दिपप्रज्वन करण्यात आले. यावेळी तळेगाव बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र भालारे,प.पु.गगनगिरी माध्यमिक विद्यालय,पिंपरणेचे प्राचार्य सोनवणे सर तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. हस्ताक्षर,वकृत्व,गोष्ट कथा सादरीकरण,वैयक्तीक गीत गायन,समुहगीत गायन,सांस्कृतिक स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.संगमनेर खुर्द बिटातील केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.सर्वच मार्गदर्शक शिक्षकांनी उत्कृष्ट मार्गदर्शनाने स्पर्धक स्पर्धेत सहभागी केल्यामुळे स्पर्धा अतिशय रंगतदार व चुरशीच्या झाल्या त्यामुळे विजेत्या स्पर्धकांचे क्रमांक निवडतांना परिक्षकांनाही आपले कौशल्य पणाला लावावे लागले.वैयक्तीक गीत गायन,समुहगीत गायन कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर सांस्कृतीक कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या डोळ्याचे अक्षरक्षा पारणे फेडले व कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ,पालक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे –
हस्ताक्षर स्पर्धा
किलबिल गट – आरुष विजय कासार (प्रथम) संगमनेर खुर्द. श्री अनिल मंडलिक (द्वितीय) देवगाव आराध्या किशोर होडगर (तृतीय) पिंपरणे
बालगट
विहान गोकुळ पवार (प्रथम) संगमनेर खुर्द आरोही योगेश शिंदे (द्वितीय) देवगाव साईश्वरी सतिष जगताप (तृतीय) पिंपरणे
किशोर गट
इकरा अमीर शेख (प्रथम) संगमनेर खुर्द साहिल सुनिल पावसे (द्वितीय) देवगाव पायल केशव घुगे (तृतीय) पिंपरणे
कुमार गट
साक्षी विलास गुंजाळ (प्रथम) संगमनेर खुर्द ज्ञानेश्वरी दिपक आहेर (द्वितीय) देवगाव वृषाली संपत खेमनर (तृतीय) पिंपरणे
वकृत्व स्पर्धा
किलबिल गट
मानसी शिवप्रसाद बिडगर (प्रथम ) पिंपरणे विहान राजेंद्र गायकवाड (द्वितीय) संगमनेर खुर्द आरती नवनाथ पानसरे (तृतीय) देवगाव
बालगट
आरोही राजेंद्र कासार (प्रथम) संगमनेर खुर्द वेदिका संजय वर्पे (द्वितीय) देवगाव संचिता शंकर तांबडे (तृतीय) पिंपरणे
किशोर गट
प्रांजल मधुकर सांगळे (प्रथम) पिंपरणे स्नेहा विकास मोदड (द्वितीय) देवगाव स्विटी अंबादास लष्करे (तृतीय) संगमनेर खुर्द
कुमार गट
प्रतिक राजु त्रिभुवन (प्रथम) संगमनेर खुर्द श्रृतिका भाऊसाहेब सांगळे ( द्वितीय) पिंपरणे ईश्वरी सोन्याबापु मोदड (तृतीय) देवगाव
वैयक्तीक गीत गायन
किलबिल गट
सार्थक गुलाब बागुल (प्रथम ) पिंपरणे माहेश्वरी राजु लष्करे (द्वितीय) संगमनेर खुर्द विहान सोमनाथ कदम (तृतीय) देवगाव
बालगट
अनन्या किशोर डोंगरे (प्रथम) संगमनेर खुर्द राधिका उल्हास पवार (द्वितीय) देवगाव अक्षरा पांडुरंग वाकचौरे (तृतीय) पिंपरणे
किशोर गट
सृष्टी अशोक शेटे (प्रथम) संगमनेर खुर्द वेदिका शिवनाथ पवार (द्वितीय) देवगाव पायल केशव घुगे (तृतीय) पिंपरणे
कुमार गट
यश मनिष केदारी (प्रथम )संगमनेर खुर्द कोमल प्रकाश कांगणे (द्वितीय) पिंपरणे साक्षी उत्तम गाडेकर (तृतीय) देवगाव
वेशभूषा सादरीकरण
किलबिल गट
रितीका गोरक्षनाथ गुंजाळ (प्रथम) संगमनेर खुर्द अनुष्का भिमाशंकर पानसरे (द्वितीय) पिंपरणे ईश्वरी किसन पवार ( तृतीय ) देवगाव
बालगट
ऐश्वर्या सचिन गुंजाळ (प्रथम ) संगमनेर खुर्द हर्षवर्धन उल्हास पानसरे (द्वितीय) पिंपरणे आराध्या शशिकांत गायकवाड (तृतीय)
किशोर गट
जोया नुरमहमद शेख (प्रथम )संगमनेर खुर्द प्राची भाऊसाहेब सांगळे (द्वितीय) पिंपरणे रोशनी संपत पवार (तृतीय )देवगाव
कुमार गट
साक्षी रंगनाथ सांगळे (प्रथम) पिंपरणे समिक्षा अशोक गुंजाळ (द्वितीय) संगमनेर खुर्द सायली विजय पवार(तृतीय) देवगाव
गोष्ट / कथा सादरीकरण
बालगट
श्रद्धा आदिक बालोडे (प्रथम ) संगमनेर खुर्द कल्याणी शरद पवार (द्वितीय) देवगाव पंढरीनाथ तात्याबा खेमनर (तृतीय) पिंपरणे
किशोर गट
ईश्वरी सोन्याबापु मोदड (प्रथम) देवगाव ॠतीका भाऊसाहेब सांगळे (द्वितीय) पिंपरणे सानिका आदिक गुंजाळ (तृतीय) संगमनेर खुर्द
कुमार गट
सृष्टी अशोक शेटे (प्रथम) संगमनेर खुर्द ईश्वरी शिवाजी दिघे (द्वितीय) देवगाव पवन सुदाम कोळेकर (तृतीय)
पिंपरणे
समुहगीत गायन
लहान गट
संगमनेर खुर्द ( निमज )प्रथम,
पिंपरणे ( हंगेवाडी )द्वितीय,
देवगाव ( शिरापुर ) तृतीय
मोठा गट
पिंपरणे ( हंगेवाडी ) प्रथम, देवगाव ( निमगाव टेंभी ) द्वितीय संगमनेर खुर्द ( खांडगाव )तृतीय
सांस्कृतिक कार्यक्रम
लहान गट
संगमनेर खुर्द (निमज)प्रथम
देवगाव (निमगाव टेंभी )द्वितीय पिंपरणे (पिंपरणे )तृतीय
मोठा गट
संगमनेर खुर्द ( खांडगाव )प्रथम
देवगाव ( निमगाव टेंभी )द्वितीय
पिंपरणे ( डिग्रस ) तृतीय
स्पर्धा यशस्वीतेसाठी संगमनेर खुर्द शाळेचे मुख्याध्यापक सकाहरी सांगळे,देवगाव केंद्राचे ईश्वर राऊत,अंभोरे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप ननवरे, डिग्रस शाळेचे मुख्याध्यापक संजय केदारी, हंगेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता जाधव तसेच मंदाकिनी मोदड,प्रतिभा दुर्गुडे,मंदादेवी गवारी,सरला सातपुते,अनिता मुरडनर, पांडुरंग गळंगे,संभाजी फड,सुभाष औटी,सुदर्शन यादव,शरद गवारी, सुनिल नवले,अशोक शेटे,विकास साठे, कविता पवार, सुनिता तरवडे,रुपाली महामुनी,रावसाहेब हळनर,प्राजक्ता शेळके,बाळासाहेब खताळ,प्रमिला हासे,संतोष शेळके,सुलभा इंगळे, भाऊसाहेब निळे,लक्ष्मण भालेराव,सारिका डुबे,धाकतोडे सर,लता गोडे,आंबरे सर,अर्चना हाडवळे,वाव्हळ मॅडम,योगिता वडनेरे तसेच तिनही केंद्रातील सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.
प्रदिप बागुल व दत्तात्रय आंबरे यांनी सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी अनिल नागणे,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड,शा.पो.आहार अधिक्षक सुवर्णा फटांगरे यांनी अभिनंदन केल

