जिल्हा परिषद शाळा टाकळी येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात आरंभ

अकोले / लोकवेध live न्यूज 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्किल ट्रि कन्सल्टिंग गाझियाबाद ( उत्तर प्रदेश) यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी, बीट देवठाण, ता. अकोले येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात आरंभ झाला आहे. सदर प्रशिक्षण कार्यशाळेतून मुलींना स्वसंरक्षणासाठी ज्युडो कराटे, कुंफू कराटे, हाय किक, रेसलिंग स्टेप्स इत्यादी विविध कलाप्रकार ४० सत्रांमधून शिकविले जाणार आहेत. या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू मुलींना स्वयंसिद्ध व शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे कोच लकी नवरंगे व रुतुजा गुरुकुले यांचे केंद्रशाळा टाकळी तर्फे स्वागत करण्यात आले. प्रस्तुत कार्यशाळेतून शाळेतील १०० टक्के मुलामुलींना आत्मरक्षणाचे कौशल्य शिक्षण दिले जाईल, याबाबत टाकळी शाळा व्यवस्थापनाने निर्णय घेतल्याबद्दल पंचायत समिती अकोले गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे यांनी शाळेतील शिक्षक श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे व संजय शिंदे तसेच व्यवस्थापन अध्यक्ष डॉ . जनार्दन मोरे, उपाध्यक्ष बाळासाहेब फोडसे, शाळा व्यवस्थापन कार्यकारिणी सदस्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!