अमृतवाहिनी अभियांत्रिकीतील एमबीएच्या 12 विद्यार्थ्यांना 5.68 लाखांच्या पॅकेजवर नोकरी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 
उच्च गुणवत्तेच्या तांत्रिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास विकासासाठी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या या महाविद्यालयात येऊन कॅम्पस इंटरव्यू घेत असतात.नुकतेच एमबीए मधील 12 विद्यार्थ्यांची बजाज फायनान्स या कंपनीत 5. 68 लाखांच्या पॅकेजवर नोकरीसाठी थेट निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश यांनी दिली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे देशातील पहिल्या दहा महाविद्यालयांमध्ये गौरविले जात आहे. NAAC चा ए प्लस हा दर्जा या महाविद्यालयाला मिळाला असून अभियांत्रिकी अंतर्गत असणाऱ्या एमबीएच्या 2023 मधील बॅचच्या 41 विद्यार्थ्यांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्यू मधून थेट नोकरी मिळाली आहे. यामध्ये स्टॉक होल्डिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंडिया मार्ट, केअर हेल्थ इन्शुरन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक ,डीसीबी बँक, बिग बास्केट स्टेट ,एच सी एल ,टी सी एस इत्यादींसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

संस्थेतील सर्व अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज लायब्ररी, इंटरनेट सुविधा, उच्च प्रतीचे तांत्रिक शिक्षण, उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधा निसर्गरम्य परिसर ,याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी कला कौशल्य ज्ञान माहिती तंत्रज्ञान यावर होणारे विविध सेमिनार यामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास केला जातो.

बजाज फायनान्स कंपनी लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये एमबीए मधील बारा विद्यार्थ्यांची 5.68 लाखांच्या पॅकेजवर थेट निवड झाली आहे.

या निवडीबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,मॅनेजर प्रा धुमाळ, प्राचार्य डॉक्टर एम ए वेंकटेश, डॉ प्रा. वृषाली साबळे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!