समाजात आईचा त्याग हा सर्वश्रेष्ठ असतो. पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
समाजात आईचा त्याग हा सर्वश्रेष्ठ हा असतो.आज मी फक्त केवळ आईने केलेल्या त्यागामुळे उभा आहे. माझ्या आईने केलेल्या त्यागामुळेच आज मी समाजासाठी काम करत आहे. असे प्रतिपादन नेत्र विशेषज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी कॉ.पी.बी.कडू पाटील फाउंडेशन, सात्रळ ता.राहुरी यांच्या विद्यमाने व रयत शिक्षणसंस्था,उत्तर विभाग अहमदनगर यांनीआयोजित केलेल्या रयत संकुल, सात्रळ येथे कॉ.पी बी कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार व मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभात समाजक्रांती पुरस्काराचे मानकरी म्हणून व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की आपण कर्तव्य पार पडताना आपले समाजातील आदर्श शोधले पाहिजे व त्यानुसार मार्गक्रमन केले पाहिजे.प्रगती करताना अनेक अडचणी येतील जेवढेअडथळे येतील तेवढा माणूस मोठा होतो.रयत शिक्षण संस्थेच्या कमवा व शिका योजनेमुळे माझ्या जीवनाचे मार्गक्रमण झालेआहे. प्रत्येकाने जीवनात थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी बी कडू पाटलांसारखे आदर्श शोधले पाहिजे. तसेचआपणच आपल्यातील कलागुणांना वाव दिल्यास आपण निश्चितच मोठे होतो. विद्यार्थ्यांनी जीवनात वाचन, मनन,सातत्य व इच्छाशक्ती बाळगल्यास यश निश्चित मिळते.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या कलागुणांनाही वाव दिला पाहिजे. यावेळी त्यांनी अवयव दानाबद्दल समाजातील अंधश्रद्धा समजून सांगितली व जीवनात अवयवदान किती महत्त्वाचे आहे हे विषद केले. आजच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत करतांना अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी सांगितले की आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांची ग्रामीण जीवनाच्या मातीशी नाळ जोडलेली आहे. महाराष्ट्राला भावणारा असाच स्वभाव या अतिथींचा असल्याने भरीव असे कार्य या मान्यवरांकडून झाले आहे ग्रामीण जीवनाशी त्यांचे घट्ट नाते व सर्वसामान्यां बद्दलची तळमळ हीच कल्पना थोर स्वातंत्र्यसेनानी मा.आ. कॉ.पी.बी.कडू पाटील यांना अभिप्रेत होती.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदर्श गाव विजेते भास्कराव पेरे पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्रेक्षकांना खळखळून हसवत अनेक ग्रामीण उदाहरण देऊन वैचारिक चपराक मारताना सांगितले की माणसानं कधीच रडायचं नसतं.फक्त लढायचं असतं.आपल्या कामात देवाला बघायचे.म्हणजेच देशसेवा हीच ईश्वरसेवा अशी भावना आपण बाळगली पाहिजे.असे विचार भास्करराव पेरे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची माजी चेअरमन व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील यांचा यांच्या कार्याचा गौरव केला. आपले मनोगत व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील,कॉ.पी.बी.कडू.पाटील आणि मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या प्रतिमेस उपस्थित. मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.
मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक समारंभात रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकामध्ये भास्कर कोकाटे, शिक्षकांतून संदिप चव्हाण, सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका म्हणून उमा चव्हाण व राज्य स्तरावर उल्लेखनीय विशेष कार्य करणाऱ्या मंगेश कडलग, सचिन पलघडमल, सच्चिदानंद झावरे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच झी मराठी वाहिनीवर सा.रे.ग.म प.चा उपविजेता जयेश खरे आणि संगीतकार प्रतिक, ऋतिक पलघडमल यांनी शाहीर आण्णाभाऊ साठे यांची गाजलेली “माझी मैना गावावर राहिली,माझ्या जीवाची होतिया काहिली”हे गीत सादर केले. कार्यक्रमास डॉ.रागिनी पारेख, डॉ.गहिनीनाथ विखे, डॉ.घावटे,दिलीपराव शिंदे अच्युतराव बनकर,डॉ. अजित पाटील,बाळासाहेब के विखे,प्रभाताई घोगरे मंगलाताई राजळे अर्जुनराव राजळे, ॲड.आर.जी.पुलाटे, ॲड.सुरेश लगड ॲड.नानासाहेब जगताप, संदीप कुलकर्णी,प्राचार्य शिवाजीराव भोर,वडजेबापू सुरेशराव वाबळे,सुधीर मस्के शांतीभाऊ गांधी,नानासाहेब जगताप ॲड.विजयराव कडू भास्करराव फणसे, संभाजीराव चोरमुंगे,किरण पा.कडू पंकज पा.कडू,विक्रांत पा.कडू प्राचार्य राजेंद्र बडे मुख्याध्यापिका निबे, पर्यवेक्षिका एस आर थोरात ,रयतचे पदाधिकारी आजी माजी प्राचार्य,रयत सेवक,ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कडलग विलास गभाले यांनी केले तर आभार प्रदर्शन रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले.
