लोटस इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी विवीध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील लोटस इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी विवीध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थानी विविध डान्स व गीतातून उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली आपल्या मुलांना नाचतांना पालकही भारावून गेले होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी विवीध गुणदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या निमित्ताने मुला मुलींनी सहभाग घेतला होता विध्यार्थानी विविध गितांवर नृत्य सादर केली त्यातील मराठी इंग्लिश हिंदी सामाजिक गाण्यांनी पालकांची मने जिंकली
यावेळी मुलांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांची उपयोग वेशभूषा केली होती ही वेशभूषा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली
विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य करत उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली.स्नेहसमेलनात लावणी , तसेच .एकांकीका ,देश भक्ती गिते अंधश्रद्धा निर्मुलन नाटिका अशा अनेक प्रकारच्या गाण्यावर मुले मुली थिरकले मुला मुलींनी शेतकरी आत्महत्या, अंधश्रद्धा निमृलनावर नाटके सादर करून उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने हेलावून टाकली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात ह्या होत्या तर यावेळी
फाउंडर ऑफ लोटस स्कूल डॉक्टर शांताराम निघुते
के एम बी एस निघुते फाउंडेशन च्या प्रेसिडेंट आणि लोटस सीबीएससी स्कूलच्या डायरेक्टर डॉक्टर नीलिमा निघुते, सेक्रेटरी डॉक्टर सत्यजित निघुते . के एम बी एस निघू ते फाउंडेशनचे डायरेक्टर बाळासाहेब बनोटे, सौ आरती विलास देशमुख, लोटस किड्स मालपाणी नगर ब्रांच संचालिका कल्याणी सोनवणे, श्री संजय सोनवणे .पालक प्रतिनिधी बाजीराव मडके आणि गोविंद चव्हाण
यांच्या सह माजी विद्यार्थी,ग्रामस्थ,पालक मोठया प्रमाणावर होते. स्कूलचे वार्षिकअहवाल वाचन प्रिन्सिपल डॉक्टर पूर्वी हलपती यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय सीईओ वैशाली निघुते मॅडम यांनी करून दिला..
सूत्रसंचालन राधिका जयंत पवार, समीर प्रभाकर रोहम, कल्याणी दत्तात्रय आहेर, निधी अनिल शिंदे. आणि ईश्वरी सुभाष निघुते यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश हरपती, कुणाल गायकवाड आणि म्युझिक टीचर पटेल सर
सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षतेर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
