“ते आराध्य दैवत राहते आमच्या मनात.” गणेश भक्तांना भरूळ घातली आहे
कनोलीच्या युवकाची गायन क्षेत्रात भरारी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यात कनोली येथील प्रणव दादासाहेब वर्पे यांनी स्वतः गाणं लिहीत ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग केले आहे या गाण्याची तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा होताना दिसत आहे तसेच त्यांच्या या पहिल्या प्रयत्नाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
वर्पे यांना संगीत क्षेत्रात लहानपणापासूनच आवड असल्याने शिक्षिका मेधा अभंग (आराधना संगीत क्लासेस )
यांच्याकडे गायन क्लास लावले हे शिकत असतानाच त्यांच्यातील गीतकार जागा झाला आणि त्यांनी “ते आराध्य दैवत राहते आमच्या मनात.”.हे
गणपती बाप्पा वर एक गीत तयार करून त्याचे नुकतेच रेकॉर्डिंग केले आहे प्रणव वर्पे स्वतःचा आवाज अतिशय गोड असून कनोली आणि परिसरात भजन असो कीर्तन असो वर्पे उपस्थित असतात आणि आपल्या गायनातून ते उपस्थित भाविकांवर आपल्या आवाजाची छाप पाडतात गेली दहा वर्षापासून त्यांनी गायन क्षेत्रात आपले नाव कमविले आहे त्यांना लिखाणाची चांगली आवड असल्याने गणपती बाप्पा वर गाणं लिहिण्याचे ठरवले आणि त्यात ते यशस्वी झाले गाणं लिहिल्यानंतर आता ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग केले या गाण्याबद्दल त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे गावातील ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा ही दिल्या आहेत
.
