Mpsc बीडच्या लेकीने नाव केलं महिलांमध्ये राज्यात पहिली

लोकवेध live न्यूज 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये माजलगावची सोनाली अर्जुन मात्रे महिलांमध्ये राज्यात प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावत बीडची मान उंचावली आहे. लेकीने जिल्ह्याचे नाव केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मुलींना कमी लेखत गर्भपात करणाऱ्यांसाठी ही खरी चपराक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 405 पदांसाठी 7 ते 9 मे 2022 मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवार ( दि. 28 ) जाहीर झाला. प्रमोद चौगुले यांनी 633 गुण घेऊन राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला तर शुभम पाटील 616 गुण घेऊन दुसरा आला. माजलगाव येथील बीडच्या सोनाली मात्रे या लेकीने महिलांमधून राज्यात प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरी येण्याचा मान पटकावला आहे. सोनाली या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा या छोट्याशा गावातील असून असून वडील शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे.बीड जिल्ह्याची मान उंचावली असल्याने सोनाली मात्रे यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार सह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!