खिरविरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बालगोपाळांचा मेळा म्हणजेच विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन
दैवत छत्रपती,नाद खुळा,खंडोबा रायाच वेड बाई,फुलपाखरू,कोकण आयलो,झुमकावाली
संगमनेर / लोकवेध live न्यूज
_या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या,मजा करा रे मजा आज दिवस तुमचा समजा ….पुस्तक नंतर वाचा,आता खेळा नाचा…_ या उक्तीप्रमाणे विद्यार्थी हा खरोखरच एक दिवस मजा करून थांबणार नाहीत तर त्यासाठी आनंदाने नाचून गाऊन अध्ययन अनुभव घ्यायलाच कोणत्याही मुलांना आवडते…म्हणुनच खिरविरे पंचक्रोशीतील सर्व जिल्हा परिषद शाळेतील म्हणजेच खिरविरे,चोमदेववाडी, धारवाडी,मानमोडी आणि तीर्थाचीवाडी येथील बालगोपाळांचा मेळा म्हणजेच विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन (स्पंदन 2023) वार शुक्रवार, दि.03.03.2023 रोजी खिरविरे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी खिरविरे गावचे प्रथम नागरीक सरपंच गणपत नामदेव डगळे अध्यक्षस्थानी होते. कार्यकमाचे उद्घाटनप्रसंगी अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ तसेच प्रमुख मान्यवर म्हणुन खिरविरे बीट विस्तार अधिकारी (शिक्षण) संभाजी झावरे व केंद्रप्रमुख विजय भांगरे आणि उपसरपंच सुभाष बेणके तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष अनुक्रमे पांडुरंग बेणके,मारुती लाडके,दशरथ कुलाळ,मोहन मेंगाळ,संजय डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला. सर्व प्रमुख अतिथी यांचा परिचय ज्ञानेश्वर सोनवणे यांनी करून दिला. तसेच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व्हा. चेअरमन कैलास सारूक्ते कार्यक्रमास उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात खिरविरे व परिसरातील सर्व शाळांची घोडदौड कायम अशीच चालूच राहावी यासाठी प्रयत्न करावेत.अतिदुर्गम भागात असलेल्या वाडी, वस्तीवर काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकांची तळमळ यातून दिसून येते,असे खताळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले.उपसरपंच सुभाष बेणके यांनी वाडी-वस्तीवर काम करण्यास उत्स्फूर्तपणे काम करीत असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे शब्दरुपी अभिनंदन केले.उपसरपंच सुभाष बेनके यांनी खिरविरे अंतर्गत येणाऱ्या सात शाळांपैकी राहिलेल्या शाळा डिजिटल करण्याबाबतची ग्वाही पंचायत समिती अधिकाऱ्यांसमोर दिली. तसेच केंद्रप्रमुख विजय भांगरे यांनी गावकर्यांनी अशीच साथ दिली तर आमचा शिक्षक कुठेच कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. आयोजित कार्यक्रमात मोरया रे (श्रीगणेशवंदना ), अगोबाई – ढगोबाई, लिंबूणीचे लिंबू ,
एकच राजा, कु-या चालल्या रानात, ब्रुम-ब्रुम, आलय आदिवासी वादळ,गाण वाजू द्या,चिऊताई, साई पालखी,दैवत छत्रपती,नाद खुळा,खंडोबा रायाच वेड बाई,फुलपाखरू,कोकण आयलो,झुमकावाली पोर,मी आदिवासी राणी हाय,खंडेराया झाली माझी दैना,चंद्रा ( लावणी),विनोदी नाटिका, केळेवाली,मला प्रितीच्या झुल्यात झुलवा,खंडोबाची कारभारीन,नाच रे मोरा,या कोळी वाड्याची शान,बैलगाडा शर्यत,कोळीगीत,आमच्या फांदीवर,शेतकरी गीत,आपली यारी इत्यादी लोकगीते,भावगीते,भक्तीगीते यांचा सुरेख संगम दिसून आला.सर्व रसिक प्रेक्षकांनी अगदी शेवटच्या क्षणी कोणतीही हालचाल न करता मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र मुख्याध्यापक संजय भांगरे,राजू काळे,वामन डगळे, ज्ञानेश्वर सोनवणे, दिगंबर वाकळे,महादेव जाधव, शिवराम नरसाळे,निलम रूपवते यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन मेघाली बच्छाव आणि नरेंद्र राठोड यांनी केले.तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी खिरविरे येथील सर्व गावकरी,वाडी-वस्तीवरील तरुण मित्रमंडळ यांचेही खूप सहकार्य लाभले म्हणुन राजू काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
