अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करावा – सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्ह्याचे तात्काळ विभाजन करा संगमनेर जिल्हा म्हणून घोषित करा अशी मागणी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे
त्यांनी निवेदनात पडले आहे की
सन्मानीय महोदय साहेब, वि२०/०१/२०२४ व २१/०१/२०२४ जानेवारी रोजी श्रीरामपुर जिल्हा कृति समितीचे अध्यक्ष मा. प्रतापरावजी भोसले साहेब यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहेत. श्रीरामपुर जिल्हा होणार नसेल तर आम्ही कोणताही नवा जिल्हा होवु देणार नाही
महोदय साहेब भंडारदरा धरण कालवे सन १९१० साली सुरु होवुन १९२६ रोजी पुर्ण म्हणजेच प्रवरेच्या पाटपाणी व रेल्वे बेलापूर स्टेशन यामुळे प्रगतशिल नवा तालुका श्रीरामपुर स्वातंत्र्याच्या दरम्यान जन्माला आला, निर्माण झाला.
आमचे संगमनेर शहर हे मध्य महाराष्ट्रातील सर्वात जुने ऐतिहासिक शहर आहे. प्रवरा, म्हाळुगी व आढाळा तिरावर वसलेले आहे, ते शहर संगमनेर तात्काळ जिल्हा म्हणुन घोषित करावे, संगमनेर हे शहर छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळापासुन उपपरगना तथा उपजिल्हा आहे. संगमनेर हे शहर अहमदनगर बरोबरीचे आहे. संगमनेर मधुन स्वातंत्र्यापुर्वी व स्वात्र्यानंतर अनेक चळवली उगम पावल्यात उदा. मीटर हटावो, त्यामुळे महाराष्ट्राला दिशा मिळुन शेतकऱ्यांना लाभ झाले, तरी घारगांव तालुका, राजुर तालुका अकोले तालुका, संगमनेर ग्रामीण तालुका राहाता तालुका, कोपरगांव तालुका, श्रीरामपुर तालुका असे सात तालुके मिळुन संगमनेर जिल्हा तात्काळ सुरु करावा हि नम्र विनंती
संगमनेर नावाची नवरी नटूनथटून बसली आहे, जिल्हा वरदेवाने वरमाळा घाळावी हि नम्र विनंती.
