जि.प. प्राथ .शाळा वाकी च्या माजी विदयार्थ्यांकडून शाळेस खुर्च्यांची भेट.
लोकसहभागातून शाळा विकास करण्याचे ध्येय-शशिकांत जाधव
पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज
मराठी शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचा पाया आहे बालकाच्या जीवनाला व शिक्षणाला आकार देण्याचे काम नेहमीच मराठी शाळेतून केले जाते . मराठी शाळा हीच खऱ्या अर्थाने जीवन विदया मंदिर आहे , असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . मातृभाषेतून शिक्षण देणारी व्यवस्था आणि मातृभाषेतील शिक्षण माणसाला
जीवनात यशस्वी बनविण्यासाठी उपयुक्त ठरले आहे . जि.प. प्राथ . शाळा वाकी येथील २००२ पूर्वीच्या माजी विदयार्थ्यांनी एकत्र येत शाळेस ५० खूर्च्यांची भेट देत आपले शाळेप्रती असणारे प्रेम आणि जबाबदारी सिद्ध केली . वर्षभरात शाळेत होणारे विविध उपक्रम आणि त्यासाठी बैठक व्यवस्थेची होणारी अडचण लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी ती अडचण सोडविण्याचा विचार केला . शा . व्य . समितीचे अध्यक्ष शशिकांत जाधव , अशोक झोले , उपसरपंच जनार्दन भोजणे, विश्वनाथ सगभोर यांनी एकमेकांशी संपर्क करत शालेय भौतिक विकासाचे ध्येय गाठण्यासाठी मदत करण्याचा आणि आपल्या गावच्या शाळेशी असलेली बांधिलकी जपण्याचा निर्णय सर्वांशी बोलू दाखवला .सन २००२ पूर्वीच्या आपल्या गावातील माजी विदयार्थ्यांना एकत्र करत भारत देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थ , पालक , शिक्षक , विदयार्थी यांच्या उपस्थितीत शाळेसाठी ५० खुर्च्या भेट दिल्या . या प्रसंगी भविष्यातही शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी भरीव सहकार्य करण्याचा मानस शा . व्य . समिती अध्यक्ष शशिकांत जाधव प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या मनोगतात व्यक्त केला . तसेच उपस्थित सर्व बांधवांना शाळेसाठी लोकसहभागातून मदत करण्याचे आवाहन केले .
श्रावण बांगर , सुनिल सगभोर , भिमा सगभोर , मनिनाथ सगभोर , प्रकाश झोले, मधुकर चौधरी , हिरामण सगभोर , संजय मुकणे , किरण सगभोर , अमोल सगभोर , नामदेव सगभोर , बाळासाहेब मुकणे , सोमनाथ सगभोर , हिरामण गवारी , माधुरी आवारी , रविंद्र सगभोर या बांधवांचे लोकसहभागासाठी मदतीचे हात पुढे आले . त्यांच्या प्रतिनिधींनी प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमास उपस्थित राहून शाळेचे मुख्याध्यापक श्री .भिमा कोकतरे व उपाध्यापिका यशोदा ढगे यांच्याकडे आपली मदत सुपूर्द केली .
शाळेचे मुख्याध्यापक भिमा कोकतरे यांनी माजी विदयार्थ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण मदतीचे शाळेच्या वतीने स्विकार करत समाधान व्यक्त केले . उपाध्यापिका यशोदा ढगे यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करत
अभिनंदन केले . गावचे सरपंच राजाराम झडे व ग्रामपंचायत सदस्य , शा . व्य . समितीनेही माजी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले .पंचायत समिती अकोले गटशिक्षणाधिकारी मा . अभयकुमार वाव्हळ ,मान्हेरे केंद्रप्रमूख सुनिल घुले , खिरविरे बिट शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी सर्व माजी विदयार्थ्यांच्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले .
ग्रामस्थांनीही या मदतीचे कौतूक केले आहे .
