रक्तदान शिबिर, महानाट्य, बैलगाडा शर्यत, क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता अभियान,वकृत्व स्पर्धेचे आयोजन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
1985 पासून संगमनेर विधानसभेचे विक्रमी मताधिक्यानं प्रतिनिधित्व करताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले .याचबरोबर संगमनेर तालुक्यात प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवताना संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल बनवले. समृद्ध सहकाराबरोबर शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून संगमनेर आज राज्याच्या नकाशावर दिसते आहे.
शहरासाठी थेट पाईपलाईन योजना, विविध वैभवशाली इमारती, गार्डनयुक्त शहर, गावोगावी रस्ते, विद्यालय, सहकारी संस्था यामधून संगमनेर तालुक्याची ओळख ही प्रगतशील तालुका बनली आहे. तालुक्याच्या विकासाबरोबर आमदार थोरात यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करताना विविध पदे भूषवली आहेत.
राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोजगार हमी, पाटबंधारे ,जलसंधारण अशी महत्त्वाची पदे भूषवली असून या खात्यांना लोकाभिमुख बनवले आहे. याचबरोबर अत्यंत अडचणीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सांभाळताना त्यांनी 44 आमदार यांना विजयी करत महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
सर्व पक्षांची सलोख्याचे संबंध, पक्षनिष्ठा ,सर्वधर्मसमभाव व पुरोगामी विचार जपणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल संपूर्ण राज्यात मोठा आदर आहे .दरवर्षी अत्यंत साधेपणाने आमदार थोरात हे वाढदिवस करत असतात. मात्र यावर्षी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने मोठमोठ्या विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये डॉ.अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी हे नाटक चार ते सात फेब्रुवारी या काळात जाणता राजा मैदानावर होणार असून ते सर्वांसाठी मोफत आहे.
तर राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पठार भागामध्ये बैलगाडी शर्यत आयोजन होत आहे. तर निमगाव जाळी, तळेगाव, येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे .अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमध्ये रक्तदान याचबरोबर वकृत्व स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य पातळीवरही बीड, परभणी अमरावती, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि लातूरमध्ये जिल्ह्यामध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन होत असून संपूर्ण राज्यभरात हा वाढदिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा होणार आहे.
शिवपुत्र संभाजी या नाटकासह आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सर्व युवक व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
