आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 6 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावे व 250 च्या वर वाडी वस्ती आहेत. या सर्व गावांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या आहेत .याचबरोबर आमदार थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले आहे. सहकार, शैक्षणिक संस्था, समृद्ध बाजारपेठ ,ग्रामीण विकास,सुसंस्कृत वातावरण यामुळे संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे.
अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत सन 2023- 24 मधील वस्तीनिहाय कामांमधून 105 वस्त्यांवरील 124 कामांसाठी 6 कोटी 55 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या अंतर्गत कवठे धांदरफळ, कवठे कमळेश्वर, खळी, खांबे, गुंजाळवाडी, चनेगाव, चंद्नापुरी, जवळेकडलग ,जाखुरी, झरेकाठी, डिग्रस, निमगाव खुर्द, निमोन, नान्नज दुमाला, निमगाव जाळी, पानोडी ,मनोली, मालुंजे, मंगळापुर ,लोहारे, वडगाव पान, वेल्हाळे, शिबलापूर, शेडगाव, संगमनेर खुर्द ,सावरगाव तळ, आश्वी बुद्रुक व खुर्द ,ओझर बुद्रुक, निळवंडे, मनोली ,राजापूर वेल्हाळे या गावांमधील विविध दलित वस्तींचा समावेश आहे .
या निधीतून या दलित वस्तीमध्ये बंदिस्त गटार तयार करणे, पेविंग ब्लॉक बसविणे, सौर पथदिवे बसवणे ,रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ,रस्ता मजबुतीकरण करणे, वीजपुरवठा सुरळीत करणे, शिडी वर्क, समाज मंदिर दुरुस्ती या कामांचा समावेश आहे.
या निधीमधून दलित वस्ती मधील ही विविध कामे होणार असल्याने वरील सर्व गावातील नागरिक व दलित वस्ती मधील नागरिकांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे
