राष्ट्रीय वैज्ञानिक प्रदर्शनात यश मिळवित श्रेया मुन्तोडे हिची नासासाठी निवड

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

राज्य विज्ञान परिषद, महाराष्ट्र राज्य यांचे विद्यमाने अहमदनगर जिल्हा गणित विज्ञान प्रदर्शन नुकतेच अहमदनगर येथे संपन्न झाले.यात रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कुल आश्वी बु. च्या श्रेया अनिल मुन्तोडे हिने सादर केलेला सीड बॉल्स हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात अव्वल ठरला असून प्रकल्पाची महाराष्ट्र शासन व राज्य विज्ञान परिषद आयोजित राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेले सीड बॉल्सचे संशोधन क्रांतिकारक व लोकोपयोगी ठरणार असून संपूर्ण प्रदर्शनात ते लक्षवेधी ठरले .जिल्हास्तरावरून श्रेयाच्या प्रकल्पाची प्रथम क्रमांकाने निवड होऊन सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे 10 फेब्रुवारी पासून होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी श्रेया सहभागी होणार असल्याचे अहमदनगर जिल्हा शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे..
अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्हा विज्ञान व गणित संघटना यांचेमार्फत श्रेयाने विज्ञान प्रदर्शनामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे साहेब यांच्या हस्ते श्रेयाला स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक व रोख बक्षीस वितरण करण्यात आले.
मा. ना. विखे साहेबांनी श्रेयाच्या उपकरणाची सविस्तर माहिती घेतली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील जिल्हा विज्ञान व गणित संघटना पदाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या यशासाठी तिला विद्यालयातील विज्ञान शिक्षिका संसारे एस. एफ. व तीचे पालक अनिल मुंतोडे ए. एच.यांचे मार्गदर्शन लाभले.श्रेयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील,रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी बोडखे साहेब व सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब आणि नाईकवाडी साहेब तसेच स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष म्हसे पाटील व बाळकृष्ण होडगर पा .तसेच सुमतीलालभाऊ गांधी,मुख्याध्यापक बर्डे जे.आर पर्यवेक्षिका लोखंडे एस.एन. ज्येष्ठ शिक्षक शहाणे आर.एन. थेटे आर.बी. वर्गशिक्षिका किरवे जे.एस. तसेच कोकाटे एच.बी तांबे एम. टी, बनकरएस.एस.,घिगे एम के ,धराडे सी.आर.,बर्डे आर.डी . कहार आर डी. सिनारे व्हीं.जी.,देवरे एस. ए., केदार आर आर पिंपळे आर.आर,केदार एन.के.सहाने बी.एम. आव्हाड व्ही.एल. गाडे ए .आर.पोखरकर एस. ए, वाकचौरे एस. के.रूपवते एस.एम. जंगले एम.एस.वायळ एम. एस.पाटील जे.बी. मुंतोडे पी.एस. काळे एस.पी. जगदाळे एस.एम. वैद्य एस. यू. गाडेकर आर.ए.उंबरकर के एस.,शिंदे एन.एस.,कडू एस.एस.दिघे बापू ,कोल्हे मामा, अहिरे मामा विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक तसेच स्कूल कमिटी शालेय व्यवस्थापन व विकास समिती तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!