ॲड.एम.एन.देशमुख विद्यालयाची दिक्षा सोनवणेची महिला राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज 

पारनेर(भाळवणी) या ठिकाणी महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची अहमदनगर जिल्हा निवड चाचणी नुकतीच संपन्न झाली.या मध्ये राजूर येथील ॲड .एम.एन देशमुख ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कु.सोनवणे दिक्षा शंकर (१२ वी कॉमर्स) हिने ५९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.सदर खेळाडूची पुणे (खराडी) येथे होणाऱ्या महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धसाठी निवड झाली आहे. दिक्षा हि अकोले तालुक्यातील मुरशद या गावची रहिवाशी आहे अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या गवळी जे. बी यांनी दिली आहे.
दिक्षा ही भारतीय खेळ प्राधिकरण नव्वी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालय साई कुस्ती सेंटर मध्ये दोन वर्षापासून कुस्ती प्रशिक्षण घेत आहे.तिला विद्यालयातील शारिरीक शिक्षक विभाग प्रमुख प्रा.विलास नवले व कुस्ती केंद्राचे कोच आंतरराष्ट्रीय पदक विजेते तान्हाजी नरके,प्रा.रविंद्र कवडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.
तिच्या या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टी. एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,नागरिक आदींनी अभिनंदन केले.तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!