मा.आमदार डॉ. सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या सहकार्यातून टाकळी केंद्रशाळेस संगणक संच भेट

अकोले / लोकवेध live न्यूज 

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे कर्तृत्ववान लोकप्रिय आमदार मा. डॉ.‌ सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या सहकार्यातून स्थानिक विकास निधी उपक्रमांतर्गत देवठाण बीटातील टाकळी जिल्हा परिषद शाळेस नुकताच एक डिजिटल संगणक संच भेट देण्यात आला आहे. या संगणक संचात एच.पी. कंपनीचा एक अद्ययावत माॅनिटर, मिनी डेस्कटॉप व कि बोर्ड शाळेस मिळाला आहे. बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या अकोले येथील सभागृहात मा. मधुकरराव नवले साहेब यांच्या शुभहस्ते सदर संचाचे वितरण करण्यात आले. टाकळी शाळेस अद्ययावत संगणक संच भेट दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. जनार्दन मोरे, उपाध्यक्ष बाळासाहेब फोडसे, पोपटराव शेवाळे, रामहरी तिकांडे, संतोष तिकांडे, दत्ताराम दातखिळे, संतोष नाईकवाडी यांनी आमदार डॉ.‌ तांबे साहेबांचे आभार मानले आहेत. तसेच टाकळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे व संजय शिंदे यांचे अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी मा. अभयकुमार वाव्हळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. अनिल गायकवाड साहेब व मा. केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!