संगमनेर विज कंपनीचा अनागोंदी कारभाराने शेतकरी- व्यापारी त्रस्त
ठेकेदारी कामांच्या भरश्यावर चालते विज कंपनी.. विज ग्राहक उपाशी.. बेईमान तुपाशी..
संगमनेर – लोकवेध live न्यूज
संगमनेर शहर व तालुक्यातील विज पुरवठा करणारी संगमनेरची विज महावितरण कंपनी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी व आपल्या कथीत अनागोंदी व अजब कारभारामुळे सतत चर्चेत असते.
प्रगतीय विवाद तिवार दि. ०४ मार्च २०२३ संगमनेर बिज कंपनीचा अनागोंदी कारभाराने शेतकरी-व्यापारी त्रस्त उपासी कमान पा संगमनेरी ठोकर विज ग्राहकांना दिलासा मिळेल हे कोणतेही काम विज कंपनीकडून होतांना दिसत नाही सर्वच कामे ठेकेदारी पद्धतीने केली जातात त्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत.
ग्राहकांना विज बिल जास्त देण्याची परंपरा कधीही बंद होत नाही ठेकेदारीत काम करणारे वायरमन हे आता मनमानी पध्दतीने काम करत आहेत. विज ग्राहकांना कसा त्रास देता येईल असाच जणू यांनी चंग बांधला आहे.

एकीकडे संगमनेर शहर व तालुक्यात पिठाच्या गिरण्या, कपडे इस्त्री करण्याच्या लॉड्या यांना चोरून विज वापरली जाते. मात्र संबंधित विज अधिकारी, कर्मचारी यांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असते तर दुसरीकडे दर महिन्याला न चुकता विज बिल भरणारे विज ग्राहक व व्यापारी वर्ग यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते एक-दोन दिवस जरी विज बिल भरणे लेट झाले तरी विज कनेक्शन कापले जाते. नव्हे तर त्यांचा तसा फतवा काढलेला दिसत आहे.
एकूणच काय तर विज कंपनीचे किस्से अनेक आहेत त्यांच्या या अनागोंदी कारभारामुळे विज ग्राहक मात्र त्रस्त झालेला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीकडे वीजजोडणी घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर कधीच नवीन विजेचे मीटर उपलब्ध होत नाही.
आठवड्यातील अनेक दिवस त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांकडे जनरेटर, इन्व्हर्टर नाहीत असे पीठगिरणी, इलेक्ट्रिक उपकरण विक्रेते, छोटे किराणा दुकानदार, आदींना व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होते. विजेची समस्या निर्माण झाल्यास तक्रार करूनही वायरमन वेळेवर येत नाहीत. अशा अनेक समस्यांमुळे संगमनेर शहर व तालुक्यातील व्यापारी त्रस्त आहेत. विजेचे मीटरवरील प्रत्यक्ष रकमेची बिले दिली जातात. चुकीच्या पद्धतीने रीडिंग घेतले जात असल्याने मीटरवरील रीडिंग आणि आलेले वीज बिल यांत मोठी तफावत असते. रीडिंग उशिरा घेतले जात असल्याने मीटर रीडिंग रेशो वाढल्याने विनाकारण प्रतियुनिट जास्त पैशांची बिले भरावी लागतात. वीज बिल कधीच मुदतीत मिळत नाही, त्यामुळे विनाकारण दंड भरावा लागतो अशा विविध प्रकारच्या तक्रारी विज ग्राहक व व्यापारी वर्गातून मिळाल्या असून याबाबत व्यापारी संतप्त झाले असून विज कंपनीचा कारभार सुधारावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
